शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

वाडीवऱ्हेनजीक भीषण अपघातात तीन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 01:12 IST

वाडीवऱ्हे : नाशिक-मुंबई महामार्गावर मुंबईकडे भरधाव वेगाने जाणारी ट्रक दुभाजक तोडत समोरुन येणाऱ्या आयशरवर जाऊन आदळली. या भीषण अपघातात ट्रकचालक, क्लिनर व आयशरचालकाचा जागीच मृत्यू झाला असून आयशरचा क्लिनर जखमी झाला. सदर अपघात बुधवारी (दि.३) सकाळी सहा वाजेच्या सुमारास वाडीवऱ्हेनजीक घडला. या अपघातात दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला असून त्यांच्यातील साहित्य रस्त्यावर इतस्तत: विखुरल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती.

ठळक मुद्देट्रक आयशरवर आदळली : एक जखमी

वाडीवऱ्हे : नाशिक-मुंबई महामार्गावर मुंबईकडे भरधाव वेगाने जाणारी ट्रक दुभाजक तोडत समोरुन येणाऱ्या आयशरवर जाऊन आदळली. या भीषण अपघातात ट्रकचालक, क्लिनर व आयशरचालकाचा जागीच मृत्यू झाला असून आयशरचा क्लिनर जखमी झाला. सदर अपघात बुधवारी (दि.३) सकाळी सहा वाजेच्या सुमारास वाडीवऱ्हेनजीक घडला. या अपघातात दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला असून त्यांच्यातील साहित्य रस्त्यावर इतस्तत: विखुरल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती.नाशिककडून ट्रक (एमएच १५ डीके-२३५५) तांदूळ घेऊन मुंबईच्या दिशेने जात असतांना वाडीवऱ्हे फाट्यानजीकच्या पेट्रोल पंपासमोर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने सदर ट्रक दुभाजकाच्या तारा तोडत मुंबईहून नाशिकच्या दिशेने काचाचे तुकडे घेऊन येणाऱ्या आयशर (क्र. एमएच ०४ जेयू -३९८६) या वाहनावर आदळला. यात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर झाला.

मृतात ट्रकचालक वीरेंद्रसिंग डुंगरसिंग परिहार, क्लिनर मोरपाल व आयशरचालक जितेंद्र यादव यांचा समावेश आहे. तसेच आयशरचा क्लिनर अस्लम खान हा गंभीर जखमी झाला असून या तिघांना जगद‌्गुरू नरेंद्र महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात हलविले. समोरासमोर झालेल्या या भीषण अपघातात ट्रकचे तुकडे झाले असून त्यातील तांदळाचे कट्टे रस्त्यावर विखुरले, तर आयशरमधील काचासुद्धा इतरत्र पसरल्या होत्या. त्यामुळे एका बाजूची वाहतूक काही काळ खोळंबली होती.

महामार्ग आणि वाडीवऱ्हे पोलिसांनी तत्काळ वाहने एकाच मार्गाने वळवली तसेच खासगी क्रेनच्या साहाय्याने दोन्ही ट्रक बाजूला करण्यात आल्यामुळे वाहतूक सुरळीत झाली. याप्रकरणी वाडीवऱ्हे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू