अपघातात तीन जागीच ठार

By Admin | Updated: April 24, 2017 02:23 IST2017-04-24T02:23:30+5:302017-04-24T02:23:40+5:30

सटाणा/देवळा : टायर फुटल्याने स्विफ्ट डिझायर कार झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली.

Three killed in the accident | अपघातात तीन जागीच ठार

अपघातात तीन जागीच ठार

सटाणा/देवळा : टायर फुटल्याने स्विफ्ट डिझायर कार झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात देवळा येथील तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. मृतांत तेरा वर्षीय बालिकेचा समावेश आहे. हा अपघात सटाणा-मालेगाव रोडवरील आराई फाट्याजवळ झाला.
देवळा येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक रामराव वामन अहेर (६५) हे त्यांचे व्याही व मालेगाव तालुक्यातील सातमाणे येथील अभियंता विजय
गोविंद जाधव (६२), नात गौरी गोरख निकम (१३), रा. ढवळीविहीर यांच्या समवेत कार (क्र . एमएच ४१ व्ही ३७२१) ने आघार येथे जात असताना ही घटना घडली. (वार्ताहर)कारमधील तिघेही नातेवाइकांच्या लग्नाला निघाले होते. आराई फाट्याजवळ कारचे पुढील टायर फुटल्याने अहेर यांचा वाहनावरील ताबा सुटला. कार झाडावर जाऊन आदळली. या अपघातात तिघांच्या डोक्याला जबर मार लागल्याने तिघेही गाडीत अडकून पडले होते. नगरसेवक काका सोनवणे, राहुल पाटील, गोटू अहेर यांनी तिघांना बाहेर काढले.
रु ग्णालयात दाखल केले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. तिघांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Three killed in the accident