तीन किलोचा जम्बो आंबा बाजारात
By Admin | Updated: June 28, 2016 00:51 IST2016-06-28T00:39:21+5:302016-06-28T00:51:47+5:30
तीन किलोचा जम्बो आंबा बाजारात

तीन किलोचा जम्बो आंबा बाजारात
सुरगाणा : येथील बाजारात सव्वादोन ते तीन किलो भरणारा कणेर जातीचा मोठा आंबा विक्रीसाठी दाखल झाल्याने या त्याला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.सोमवारी येथे विक्र ीसाठी आलेला हा कणेर आंबा येथील आंबा बाजारात सर्व जातीच्या आंब्यांमध्ये सर्वात मोठा असून, या आंब्याची प्रतिकिलो ५० रुपये दराने विक्र ी होत आहे. चवीला गोड असलेल्या या आंब्याच्या झाडाची उंची केवळ ५ ते ६ फूट असून, दरवर्षी ४० ते ५० आंब्यांचे उत्पादन निघत असल्याचे आंबा विक्रेते चौधरी यांनी सांगितले. (वार्ताहर)