तीन इच्छुकांनी साधला मुहूर्त
By Admin | Updated: January 31, 2017 23:28 IST2017-01-31T23:28:03+5:302017-01-31T23:28:24+5:30
पश्चिम प्रभाग : तिन्ही इच्छुकांकडून पक्ष चिन्हाची मागणी

तीन इच्छुकांनी साधला मुहूर्त
नाशिक : पश्चिम विभागात नामनिर्देशनपत्र सादर करण्याच्या पाचव्या दिवशी तीन इच्छुकांनी माघी श्री गणेश जयंतीचा मुहूर्त साधला. विभागातील ७, १२ व २४ या तिन्ही प्रभागांमधून इच्छुकांनी अर्ज दाखल केले असून, आतापर्यंत पश्चिम विभागीय कार्यालयात एकूण ४ अर्ज दाखल झाले आहेत. नाशिक महापालिका निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र सादर करण्याच्या पाचव्या दिवशी प्रभाग क्रमांक ७ ड मधून योगेश हिरे सर्वसाधारण खुल्या जागेवरून अर्ज सादर केला आहे. तर देवीदास सरकटे यांनी प्रभाग क्रमांक १२ ड मधून सर्वसाधारण खुल्या जागेवरून नामनिदेशनपत्र सादर केले. प्रभाग क्रमांक २४ ड मधून प्रवीण तिदमे यांनी सर्वसाधारण खुल्या जागेवरून अर्ज सादर केला. विशेष म्हणजे पश्चिम विभागातून पाचव्या दिवशी तिन्ही इच्छुकांनी सर्वसाधारण खुल्या जागेवरून अर्ज दाखल केला आहे. मात्र हे तिन्ही इच्छुक वेगवेगळ्या प्रभागातून निवडणुकीच्या रणांगणात उतरणार आहेत.
या तिन्ही उमेदवारांनी पक्ष चिन्हांची मागणी केली असली तरी कोणत्याही उमेदवाराने पक्षाचा एबी फॉर्म सादर केला नसल्याने अद्याप कोणाचीही पक्षाची उमेदवारी निश्चित नसल्याची चर्चा होत आहेत. दरम्यान, पाचव्या दिवशी अर्ज दाखल करणाऱ्या इच्छुकांमध्ये विद्यमान आमदारांच्या कु टुंबातील सदस्यांचाही समावेश असल्याने काही पक्षांनी ठराविक उमेदवारांना उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती दिल्याचे संकेत असून, केवळ पक्षातील बंडखोरी टाळण्यासाठी उमेदवारांची यादी जाहीर केली जात नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. (प्रतिनिधी)