दुचाकींच्या अपघातात तिघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:18 IST2021-04-30T04:18:29+5:302021-04-30T04:18:29+5:30

तिघे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. हे अपघात राका कॉलनीसमोर शरणपूर रोड व गंगापूर रोडवरील आनंदवल्लीजवळ झाले. सुदैवाने ...

Three injured in two-wheeler accident | दुचाकींच्या अपघातात तिघे जखमी

दुचाकींच्या अपघातात तिघे जखमी

तिघे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. हे अपघात राका कॉलनीसमोर शरणपूर रोड व गंगापूर रोडवरील आनंदवल्लीजवळ झाले. सुदैवाने यामध्ये जीवितहानी टळली.

गंगापूर रोडवर आनंदवल्ली परिसरात भरधाव दुचाकी चालविताना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात आकाश खंडू

वाबळे (२६, रा. शिवाजीनगर) हा युवक गंभीर जखमी झाला. हा अपघात मंगळवारी (दि.२७) रात्री ९ वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरा अपघात दुपारी ४ वाजता शरणपूर रोडवरील राका कॉलनीजवळ घडला. या घटनेत शरद निवृत्ती पांगरे (रा. जुने सिडको) व विष्णू पंढरीनाथ खुबे (३२, रा. जुने सिडको,

नाशिक) हे दोघे जखमी झाले आहेत. दुपारच्या सुमारास खुबे व पांगरे हे त्यांच्या मोपेड दुचाकीने (एमएच १५ जीजी ९२५२) या मोपेड राका कॉलनीकडून बाहेर येत शरणपूर रोड ओलांडत असताना भरधाव आलेल्या एका अज्ञात काळ्या रंगाच्या बजाज पल्सर दुचाकीने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यामुळे पांगरे व खुबे दोघे रस्त्यावर कोसळले आणि गंभीर जखमी झाले. यावेळी पल्सरचालकाने अपघातस्थळी थांबून त्यांना आपत्कालीन मदत करण्याऐवजी घटनास्थळाहून वाहनासह पोबारा केल्याचे खुबे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी

सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Three injured in two-wheeler accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.