पाडळी येथील अपघातात तिघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 17:04 IST2019-11-13T17:03:33+5:302019-11-13T17:04:04+5:30

नांदूरवैद्य-: नाशिक - मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील पाडळी देशमुख जवळ कार व दुचाकी यांच्यामध्ये झालेल्या अपघातात तीन गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (दि.१२) रोजी राञी ८:१५ वाजेच्या सुमारास घडली.

 Three injured in accident at Padali | पाडळी येथील अपघातात तिघे जखमी

?) अपघातात समोरून जात असलेल्या मोटसायकलस्वारास जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात कारची झालेली अवस्था. 

ठळक मुद्दे जखमींना गोंदे फाटा येथील जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या रु ग्णवाहिकेतून उपचारासाठी नाशिक येथील जिल्हा रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


नांदूरवैद्य-: नाशिक - मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील पाडळी देशमुख जवळ कार व दुचाकी यांच्यामध्ये झालेल्या अपघातात तीन गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (दि.१२) रोजी राञी ८:१५ वाजेच्या सुमारास घडली.
नाशिक - मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील पाडळी देशमुख जवळ मुंबईहून नाशिककडे भरधाव वेगाने जात असतांना कारच्या क्र मांक (एम.एच.१५, डी.एल.७) चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे समोरच जात असलेल्या दुचाकी क्र मांक (एम.एच.१५,एफ.जी.८१५१) या दुचाकीस्वारास जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात शिवाजी पोपट घारे (२९ , रा.भरवज ता.इगतपुरी), हरि दामू शिंदे (४०,रा.भरवज ता.इगतपुरी) व रविंद्र अमृता भले( ३७, रा.निरपण) हे तीन जण गंभीर जखमी झाले आहे. या झालेल्या अपघातात मोटरसायकलचे नुकसान झाले आहे. जखमींना गोंदे फाटा येथील जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या रु ग्णवाहिकेतून उपचारासाठी नाशिक येथील जिल्हा रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे.अपघातातील कारच्या चालकाला वाडिव-हे पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

Web Title:  Three injured in accident at Padali