पाडळी फाट्याजवळील अपघातात तीन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:11 IST2021-07-12T04:11:16+5:302021-07-12T04:11:16+5:30

नाशिक - मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील पाडळी देशमुख येथे नाशिकहून मुंबईकडे जात असताना कार (क्रमांक एमएच १५, एफ.टी.००६१) वरील चालकाचे ...

Three injured in accident near Padli Fateh | पाडळी फाट्याजवळील अपघातात तीन जखमी

पाडळी फाट्याजवळील अपघातात तीन जखमी

नाशिक - मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील पाडळी देशमुख येथे नाशिकहून मुंबईकडे जात असताना कार (क्रमांक एमएच १५, एफ.टी.००६१) वरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे झालेल्या अपघातात सुनील तुकाराम काळभोर (५९,) सुनीता सुनील काळभोर (४३) व धीरज सुनील काळभोर (२६, सर्व रा. पंचवन नगर, ओझर जि. नाशिक) हे तिघेही गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती वाडिवऱ्हे पोलीस स्टेशनला दिल्यानंतर वाडिवऱ्हे पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी आदींनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. यानंतर गोंदे फाटा येथील जगत्‌गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेचे चालक निवृत्ती गुंड यांना या अपघाताची माहिती मिळताच तातडीने त्यांनी घटनास्थळी दाखल होत अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना नाशिक येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

Web Title: Three injured in accident near Padli Fateh