कोरोनामुळे गेल्या मार्च महिन्यापासून अनेक उद्योग व्यवसाय ठप्प झाले. अनेकांच्या नोकऱ्या जाऊन बेरोजगार झाले. त्यानंतर हळूहळू काही व्यवसाय सुरू झाल्याने काही बेरोजगारांना पुन्हा काम मिळाले मात्र लहान मुलांच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा अद्याप बंदच असल्याने स्कूल बसचालकांची उपासमार होत आहे. मालेगाव तालुक्यात उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे सुमारे २७५ स्कूल बसची नोंद आहे. अधिकृतरित्या शासन दरबारी पावणे तीनशे स्कूल बसचालकांची नोंद असली तरी काही शाळांमध्ये रिक्षाद्वारे मुलांना पालक शाळेत पोहोचवत असतात. रिक्षा सुरू झाल्याने मुलांना शाळेत पोहोचविण्याचे काम जरी त्यांच्याकडे नसले तरी ते इतर प्रवासी वाहतूक करीत आहेत. त्या तुलनेत शाळांच्या अधिकृत स्कूलबस बंदच असल्याने चालक बेरोजगार झाले आहेत.इतर मोठ्या मुलांच्या शाळा राज्यात काही भागात सुरू झाल्या आहेत; मात्र लहान मुलांच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू होण्याची चिन्हे दिसत नाहीत,खासगी इंग्रजी स्कूल सुरू नसल्याने त्या संस्थाचालकांपुढे शिक्षकांचे वेतन कसे द्यावे असा प्रश्न आहे. त्यात ऑनलाईन शिक्षण सुरू झाल्याने लहान मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न तसाच रेंगाळून आहे.मजुरी करण्याची वेळखासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये असणाऱ्या स्कूल बसचालकांना संस्थाचालकांकडून केवळ साडेसहा हजार ते दहा हजार रुपयांपर्यंत वेतन देण्यात येते, परंतु सध्या कोरोनामुळे मिळणारे तुटपुंजे वेतनही बंद पडले असून संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडले आहे. त्यातील काही स्कूल बसचालकांनी शेतीवर मजुरीचे काम सुरू केले आहे तर काही स्कूल बस चालकांनी शहरात काम शोधणे सुरू केले आहे मात्र त्यातही कोरोना आडवा येत असून कोरोनाच्या दहशतीमुळे त्यांना शहरात देखील काम मिळविताना अडचण येत आहे.
तीनशे स्कूल बसचालकांची होतेय उपासमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 00:27 IST
शफीक शेख मालेगाव : तालुक्यातील इंग्रजी माध्यमाच्या लहान मुलांच्या शाळा अद्याप बंदच असल्याने त्यांची ने-आण करणाऱ्या सुमारे तीनशे स्कूल बसचालकांची उपासमार होत असून, त्यांच्या अडचणीत भर पडली आहे. इतर कोणताही व्यवसाय नसल्याने उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न स्कूल बसचालकांपुढे पडला आहे.
तीनशे स्कूल बसचालकांची होतेय उपासमार
ठळक मुद्देमालेगाव तालुका : शाळा बंद असल्याने अडचणींत भर