शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
6
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
7
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
8
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
9
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
10
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
11
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
12
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
13
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
14
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
15
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
16
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
17
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
18
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
19
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
20
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ

दुकान फोडून तीन लाखांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 01:37 IST

जुन्या मुंबई-आग्रा रोडवरील श्रीहरी कुटे मार्गाच्या परिसरातील फरशीच्या दुकानाला मागील दरवाजाला असलेले कुलूप तोडून चोरट्यांनी गल्ल्यातून साडेतीन लाख रुपयांची रक्कम चोरल्याची घटना घडली आहे.

नाशिक : जुन्या मुंबई-आग्रा रोडवरील श्रीहरी कुटे मार्गाच्या परिसरातील फरशीच्या दुकानाला मागील दरवाजाला असलेले कुलूप तोडून चोरट्यांनी गल्ल्यातून साडेतीन लाख रुपयांची रक्कम चोरल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चोरट्यांनी बुधवारी (दि.६) जुन्या मुंबई-आग्रा रोडवरील श्रीहरी कुटे मार्ग परिसरातील फरशीचे दुकान फोडले. दुकानाच्या मागील बाजूला असलेल्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश करीत गल्ल्यातून साडेतीन लाख रुपयांची रक्कम चोरली आहे. गोविंदनगर भागातील रहिवासी पीयूष राजेंद्र डुंगरवाल यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार श्रीहरी कुटे मार्गावरील बिझनेस बिल्डिंगच्या शॉप नंबर १८ मध्ये ही चोरीची घटना घडली असून चोरट्यांनी त्यांच्या दुकानाच्या मागील दरवाजास लावलेले कुलूप बनावट चावीच्या सहाय्याने उघडून आत प्रवेश केला. त्यानंतर गल्ल्यातून ३ लाख ४० हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. मुंबई नाका पोलीस ठाण्यात घरफोेडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.महिलेच्या गळ्यातील पोत लांबविलीनाशिकरोड : डावखरवाडी येथे पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील ४२ हजार रुपये किमतीची दीड तोळ्याची सोन्याची पोत दुचाकीवर आलेल्या दोघा सोनसाखळी चोरट्यांनी ओढून चोरून नेली.जयभवानीरोड पुष्परंग हौसिंग सोसायटीत राहणाऱ्या वंदना सदानंद बामणे (५९) या बुधवारी सायंकाळी रिक्षाने श्री घंटी म्हसोबा मंदिर येथे उतरून दूध घेऊन रस्त्याने पायी घरी जात होत्या. यावेळी समोरून दुचाकीवर आलेल्या दोघा सोनसाखळी चोरट्यांनी बामणे यांच्या गळ्यातील दीड तोळ्याची ४२ हजार रुपये किमतीची सोन्याची पोत ओढून चोरून नेली. सोन्याची पोत ओढल्यानंतर दोघे दुचाकीवरून चोरटे सुसाट वेगाने पळून गेले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी