सातपूर परिसरात तीन गॅरेजला आग

By Admin | Updated: April 13, 2017 01:01 IST2017-04-13T00:59:21+5:302017-04-13T01:01:21+5:30

दुचाकी खाक : आगीचे कारण गुलदस्त्यात

Three garages fire in Satpur area | सातपूर परिसरात तीन गॅरेजला आग

सातपूर परिसरात तीन गॅरेजला आग

सातपूर : महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालयालगत असलेल्या तीन गॅरेजला लागलेल्या आगीत जवळपास १३ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी वेळीच आग आटोक्यात आणल्याने आजूबाजूच्या घरांचे नुकसान टळले.
नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालयालगत गॅरेज आहेत. यातील तीन गॅरेजला सकाळी नऊ वाजेच्या सुमारास आग लागली. या आगीत आर्यन आॅटो आणि एनएसके आॅटोमोबाइल यांच्याकडे दुरुस्तीला आलेल्या दोन दुचाकी, दुकानातील किमती स्पेअरपार्ट जळून खाक झाले, अशी माहिती अग्निशमन सूत्रांनी दिली.
या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे एन. एस. थोरात, पी. बी. परदेशी, व्ही. के. मुसळे, पी. एस. सूर्यवंशी, विलास निर्वाण, जे. एन. गायकवाड आदिंनी दोन बंबांच्या साहाय्याने आग आटोक्यात आणली.

Web Title: Three garages fire in Satpur area