शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये तीन गणेशभक्त बुडाले; 5 लोकांना वाचविण्यास यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2019 19:56 IST

नदीपात्रात उतरलेले तीन गणेशभक्त बुडाले असून दोघांना नदीच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढण्यास जीवरक्षक व अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले.

नाशिक : शहर व परिसरात गणेश मूर्ती विसर्जन करण्यासाठी नदीपात्रात उतरलेले तीन गणेशभक्त बुडाले असून दोघांना नदीच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढण्यास जीवरक्षक व अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. नाशिकमधील गंगापूर येथील सोमेश्वर धबधबा येथे तिघेजण बुडाले. 5 गणेशभक्तांना सुरक्षित बाहेर काढण्यास अग्निशमन व जीवरक्षक दलाच्या जवानांना यश आले तर एक महाविद्यालयीन तरुण युवक बेपत्ता झाला आहे.तसेच रामकुंडाजवळ संत गाडगे महाराज पुलाखाली एका प्रशांत पाटील(३८) नावाच्या युवकाने गोदावरीत बाप्पा ला निरोप देताना सूर लगावला; मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो गटांगळ्या खाऊ लागला ही बाब अग्निशमन व जीवरक्षक दलाच्या जवानांच्या लक्षात येताच जीवरक्षक दीपक जगताप याने नदीत उडी घेतली तर लिडिंग फायरमन इकबाल शेख, घनश्याम इंफाळ, तानाजी भास्कर यांनी राबरी बोटीने पाठलाग सुरू केला. रोकडोबा व्यामशाळेपासून पुढे बुडणाऱ्या युवकाला रेस्क्यू करण्यास यश आले. तसेच जगन्नाथ शर्मा (वय 40), मनोज भारत (वय  42), श्रीवास्तव  ( वय 50) या तिघांना ही अग्निशमन दलाच्या जवानांनी रेस्क्यू केले.तसेच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पहिने येथे नदीपात्रात गणेशमूर्ती विसर्जन  सुमारे पंचवीस जण आले होते . त्यात चौघांनी गणपती बुडविण्यासाठी  पाण्यात  उड्या घेतल्या त्यातील तीन जण बाहेर आले परंतु  युवक युवराज राठोड (वय २८,रा.अंबड)  हा काही वर आला नाही ,  मित्रांनी पाण्यात शोध घेतला परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडल्याची घटना घडली आहे. मागील वर्षी याच तलावात दोन तरुण  बुडाले होते, मागील वर्षाची पुनरावृत्ती घडल्याने प्रशासनाच्या बंदोबस्तावर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे.सदरील घटनेची माहिती मिळताच त्र्यंबकेश्वर व वाडीवरहे  पोलीस प्रशासन  घटनास्थळी दाखल झाले आहेत , बुडालेल्या राठोड चा शोध अंधार पडेपर्यंत सुरू होता.

गंगापूर धरणातून गोदावरीच्या पत्रात सुमारे 1 हजार क्युसेक पाणी सोडले जात आहेत. तसेच त्रंबकेश्वर भागात देखील पाऊस जोरदार झाल्याने येथील तलाव, नद्या, ओहोळ दुथडी वाहत आहेत. अनंत चतुर्दशी च्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी विसर्जन साठी नदीपात्रात न उतरण्याचे आवाहन केले होते.

टॅग्स :NashikनाशिकGanpati Festivalगणेशोत्सव