लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : शालिमार चौकातील एका जुगार अड्ड्यातून तीन जुगारांना पकडण्यात पोलिसांना यश आले. शहर गुन्हे शाखेच्या युनिट १च्या पथकाने रविवारी (१४) संध्याकाळी जुगार अड्ड्यावर छापा टाकून केलेल्या कारवाईत या तिघांना अटक करण्यात आले. पोलिसांनी केलेल्या कारवाईत अड्ड्यात जुगार खेळणाऱ्यांकडून एक हजार २६० रुपयांची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या एका अधिकाऱ्याला या ठिकाणी जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीवरून जुगार अड्ड्यावर छापा मारण्याची कारवाई करण्यात आली. शालिमार चौकातील एका इमारतीच्या तळमजल्यात काही युवक जुगार खेळत असल्याचे समोर आले. यावेळी पोलिसांनी राकेश कोळपकरसह अन्य दोघांना ताब्यात घेतले असून, याप्रकरणी भद्रकाली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तीन जुगारी गजाआड
By admin | Updated: May 15, 2017 16:58 IST