दिवसभरात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या

By Admin | Updated: December 1, 2015 23:05 IST2015-12-01T23:04:17+5:302015-12-01T23:05:04+5:30

मालेगाव तालुका हादरला

Three farmers' suicides during the day | दिवसभरात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या

दिवसभरात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या

मालेगाव : तालुक्यात मंगळवारी दिवसभरात तीन वेगवेगळ्या ठिकाणी शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या. तालुक्यातील शेतकरी आत्महत्त्यांची या वर्षाची आकडेवारी १९ झाली आहे. मंगळवारी सकाळी ६ वाजेपासून दुपारी ३ वाजेपर्यंत तीन शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या.

मालेगाव तालुका हादरला

1) पहिली घटना सकाळी ६ वाजता सोनज गावात उघडकीस आली. येथील गणेश हिम्मत बच्छाव (३३) यांनी शेतातील घरापासून सुमारे शंभर मीटर अंतरावर असलेल्या फूल केसरच्या झाडाला गळफास
घेऊन आत्महत्त्या केल्याचे आढळून आले. या प्रकरणी देवीदास मोतीराम बच्छाव (५४) यांनी तालुका पोलीस ठाण्यात माहिती दिली आहे. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून जमादार मोहन मोरे तपास करीत आहेत. या प्रकरणी तलाठ्याने पंचनामा केला आहे. त्यात गणेश यांच्या नावावर गटनंबर ५२१/अ/१ यात १.२२ आर शेतजमीन आहे. त्या जमिनीवर विकास संस्थेचे ४५ हजार रुपये कर्ज आहे. गणेश यांच्या वडिलांच्या नावावर गट नं. ४ मध्ये ०.६२ आर जमीन आहे. त्या जमिनीवर विकास संस्थेचे ४१ हजार रुपये कर्ज आहे.

2)दुसरी घटना तालुक्यातील पाडळदे येथे उघडकीस आली आहे. या घटनेत महेश बन्सीलाल सोनवणे (३३) हे शेतकरी दुपारी दीड वाजेच्या सुमारास पिंपळे शिवारातील शेतात मृतावस्थेत मिळून आले आहे. या प्रकरणी ज्ञानेश्वर भगतसींग जिंगर यांनी तालुका पोलीस ठाण्यात माहिती दिली आहे. महेश हे सकाळी ७ वाजता शेतात गेला होते. त्यांनी विषारी औषध सेवन केल्याचे उघड झाले आहे. तालुका पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्युची नोंद केली असून, हवालदार एस. के. बोगीर तपास करीत आहेत. याप्रकरणी तलाठी यांनी पंचनामा केला असून, त्याच्यावर अडीच ते तीन लाखाचे कर्ज असल्याची माहिती आहे.

3)तिसरी घटना तालुक्यातील झोडगे येथे झाली आहे. या घटनेत प्रवीण भटू मगर यांनी विषारी औषध सेवन केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा पंचनामा झोडगे तलाठ्याने दिला आहे. या पंचनाम्यावरुन आपण तहसीलदारांना अहवाल दिला आहे. प्रवीण यांच्याकडे सामाईक खात्यात शेतजमीन असून, वाटा पडलेला नाही. प्रवीण यांच्यावर कर्ज नसल्याची माहिती सर्कल वाघ यांनी दिली. मयत प्रवीण यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले आहेत. दरम्यान या प्रकरणी तालुका पोलिसांत कोणतीही नोंद करण्यात आलेली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (वार्ताहर)

Web Title: Three farmers' suicides during the day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.