मालेगाव : कांद्याला बाजारात मिळत असलेला कवडीमोल भाव, दुष्काळी परिस्थिती, कर्जाची परतफेड कशी करायची या विवंचनतून तालुक्यातील तीन शेतक-यांनी एकाच दिवशी आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कंधाणे, सायने खुर्द आणि नांदगाव बुद्रुक येथील हे शेतकरी असून त्यातील दोघा शेतक-यांनी विष प्राशन करुन आपले जीवन संपवले तर नांदगाव बुद्रुक येथील शेतक-याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. येथील तहसिल कार्यालयात तिघा शेतकºयांच्या आत्महत्येप्रकरणी नोंद घेण्यात आली आहे.बाजारात कांद्याचे कोसळलेले दर, आई-वडीलांच्या नावे असलेल्या कर्जाची परतफेड कशी करायची या विवंचनेतुन तालुक्यातील कंधाणे येथील ज्ञानेश्वर दशरथ शिवणकर (३५) या तरुण शेतक-याने शेतात साठवलेल्या कांद्याच्या ढिगा-या जवळच विष प्राशन करुन आत्महत्या केली. ज्ञानेश्वरच्या आई-वडीलांच्या नावावर विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे प्रत्येकी ७५ हजार रुपये पीक कर्ज आहे तर नातेवाईकांकडून हात उसनवार पैसे देखील शिवणकर कुटुंबियांनी घेतले आहे. यंदाच्या कर्जमाफी योजनेचा त्यांना लाभ मिळाला नाही. ज्ञानेश्वरच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे. दुसरी घटना सायने खुर्द येथे घडली आहे. घर बांधण्यासाठी खाजगी बॅँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करायची या विवंचनेतुन आलेल्या नैराश्येतुन तालुक्यातील सायने खुर्द येथील वसंत बंकट सोनवणे (५५) या शेतक-याने गुरुवारी विष प्राशन केले होते. शुक्रवारी त्यांचा उपचार सुरू असताना मृत्यु झाला आहे. वसंत पाटील यांच्या नावावर दसाणे सोसायटीचे दीड लाख रुपये कर्ज आहे.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन विवाहित मुली असा परिवार आहे.नांदगाव बुद्रुकला गळफास घेऊन आत्महत्यातालुक्यातील नांदगाव बु।। येथे चेतन केदा बच्छाव (२३) या अविवाहित तरुण शेतकºयाने कर्जाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. चेतन याने गट क्रमांक १२८/१ अ मधील राहत्या घरी आत्महत्या केली. त्याच्या नावावर ६५ हजार रुपयांचे कर्ज आहे तर नाशिक येथील फायनान्स कंपनीचे ५ लाख २१ हजार १६७ रुपये कर्ज घेतले आहे. त्याच्या पश्चात दोन विवाहित बहिणी आहेत.
नाशिक जिल्ह्यात तीन शेतक-यांची एकाच दिवशी आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 18:14 IST
एकाने कांद्याच्या ढिगा-याजवळच घेतले विष
नाशिक जिल्ह्यात तीन शेतक-यांची एकाच दिवशी आत्महत्या
ठळक मुद्देज्ञानेश्वरच्या आई-वडीलांच्या नावावर विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे प्रत्येकी ७५ हजार रुपये पीक कर्ज आहे