मालेगाव कॅम्प रस्त्यावरील ५० अतिक्रमणे मनपाकडून उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 18:07 IST2020-03-18T18:06:53+5:302020-03-18T18:07:13+5:30
मालेगाव मध्य: मालेगाव कॅम्प रस्त्यावरील ५० अतिक्रमणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने उद्ध्वस्त केली.

मालेगाव कॅम्प रस्त्यावरील ५० अतिक्रमणे मनपाकडून उद्ध्वस्त
मोसमपूल ते दीपक चित्रपटगृहापर्यंतच्या रस्त्याने मोकळा श्वास घेतला. त्यात अतिक्रमणे काढण्यावरून अधिकाऱ्यांची काही नागरिकांशी किरकोळ झालेले वाद वगळता मोहीम शांततेत पार पडली. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाचे प्रमुख राजू खैरनार, प्रभाग अधिकारी सुनील खडके यांच्या नेतृत्वाखाली पथकाने बुधवारी सकाळी अतिक्रमणे का ढण्याच्या कामास प्रारंभ केला. त्यात बीट मुकादम, कर्मचारी, जेसीबी, पोकलॅण्ड, चार ट्रॅक्टर व इतर दोन वाहनांचा वापर करण्यात आला.