आजपासून तीन दिवस ‘ड्राय डे
By Admin | Updated: October 13, 2014 00:49 IST2014-10-13T00:44:41+5:302014-10-13T00:49:30+5:30
आजपासून तीन दिवस ‘ड्राय डे

आजपासून तीन दिवस ‘ड्राय डे
’नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून बुधवारपर्यंत तीन दिवस जिल्ह्यात मद्यविक्री बंदी करण्यात येणार आहे़ त्यामुळे मद्यप्रेमींना पुढील तीन दिवस मद्याविनाच व्यतित करावे लागणार आहेत.
विधानसभा निवडणुकीनिमित्त मतदारांना आकर्षित करण्यासाठी मद्याचा वापर होण्याची शक्यता गृहीत धरून राज्य उत्पादन शुल्क विभागाने आचारसंहिता लागू होताच जिल्ह्यात भरारी पथकांद्वारे काम सुरू आहे़
या पथकाने छापे टाकून हजारो लिटर देशी-विदेशी दारू, रसायन जप्त करून नष्ट केले़ विधानसभेसाठी येत्या बुधवारी (दि़१५) रोजी मतदान होत असून, सोमवार ते बुधवार ड्राय डे घोषित करण्यात आला आहे़
सोमवारी (दि़१३) सायंकाळी सहा वाजेपासून ते बुधवारी (दि़१५) सायंकाळपर्यंत जिल्ह्यातील सर्व मद्यविक्री दुकाने बंद राहणार आहेत़ (प्रतिनिधी)