Three days public cafe at Ghorwad | घोरवड येथे  तीन दिवस जनता कफ्यू

घोरवड येथे  तीन दिवस जनता कफ्यू

सिन्नर:  ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव वाढत असल्याने घोरवड येथे आज शुक्रवारपासून तीन दिवस जनता कफ्यू पाळण्यात येणार आहे. ग्रामपंचायत व ग्राम समितीच्या  बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सरपंच रमेश हगवणे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीस सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. परिसरातील शिवडे, पांढुर्ली, विंचूर दळवी येथे कोरोना बाधित रु ग्ण आढळले आहेत. त्यामुळे साविधगरीचा उपाय म्हणून घोरवड येथेही कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बंदच्या काळात अन्य गावातील पाहुण्यांनाही गावात येण्यास बंदी करण्यात आली आहे. विशेषत: रु ग्ण आढळून येत असलेल्या गावातील व्यक्तींना घोरवड येथे प्रवेश बंद असणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहणार असल्याचे सरपंच हगवणे यांनी कळवले आहे.

Web Title: Three days public cafe at Ghorwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.