शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

गोळीबार प्रकरणात दोघांना तीन दिवस कोठडी ; पोलिसांकडून शस्त्र पुरविणाऱ्याचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2020 16:59 IST

उदयनगर परिसरात गोळीबार झाल्यानंतर पोलींनी संसयितांचा माग काढून सोमवारी सायंकाळी द्वारका परिसरातून दोघा संशयितांना अटक केली होती,  त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तूल चार जिवंत काडतूसे रिक्षा व दुचाकी जप्त करण्यात आले असून दोघाही संशयितांना मंगळवारी (दि.१०)न्यायालयात हजर केले करण्यात आले होते. या दोघांचीही न्यायालयाने तीन दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.

ठळक मुद्देगोळीबार प्रकरणातील दोन संशयित अटकेतदोन पिस्तुल व चार जिवंत काडतुसे हस्तगत संशयितांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

नाशिक : मालेगाव स्टॅन्ड परिसरात  महिन्याभरापूर्वी दारू पिण्याच्या कारणावरून झालेल्या वादाची कुरापत काढून सोमवारी (दि.९) मखमलाबाद शिवारात उदयनगर येथे किरण गोविंद भडांगे याच्यावर गोळीबार करणाऱ्या दोघा संशयित आरोपींची न्यायालयाने तीन दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी केली आहेउदयनगर परिसरात गोळीबार झाल्यानंतर पोलींनी संसयितांचा माग काढून सोमवारी सायंकाळी द्वारका परिसरातून दोघा संशयितांना अटक केली होती,  त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तूल चार जिवंत काडतूसे रिक्षा व दुचाकी जप्त करण्यात आले असून दोघाही संशयितांना मंगळवारी (दि.१०)न्यायालयात हजर केले करण्यात आले होते. या दोघांचीही न्यायालयाने तीन दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.  मखमलाबाद शिवारात उदयनगर परिसरात सोमवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास  रिक्षा व दुचाकीवरून आलेल्या संशयित आरोपी प्रशांत बाळासाहेब फड, चेतन दीपक वाघ, कुणाल सुधाकर एखंडे, सचिन उर्फ वास्तव पवार या चौघांनी इस्त्रीच्या दुकानाजवळ उभ्या असलेल्या भडांगेवर पिस्तूलातून दोन गोळ्या झाडल्या होत्या. या घटनेनंतर संशयित पसार झाले होते. पोलिसांनी प्रशांत फड, कुणाल एखंडे यांना द्वारका परिसरातून ताब्यात घेतल्यानंतर दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात आले होते.  गेल्या महिन्यात मालेगाव स्टँड येथे संशयित व भडांगे यांच्यात दारू पिण्याच्या कारणावरून वाद झाले होते, त्याचा वचपा काढण्यासाठी सोमवारी भडांगेवर गोळीबार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, गुन्ह्यात वापरलेले दोन गावठी पिस्तूल तसेच चार जिवंत काडतुसे व रिक्षा क्रमांक एमएच १५ एफयू ५१०१, दुचाकी सिटी डॉन क्रमांक एमएच १५ जीएच ५२२८  म्हसरूळ पोलिसांनी जप्त केली आहे. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, पोलीस उपनिरीक्षक संजय पवार तपास करीत आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिसCourtन्यायालयFiringगोळीबार