शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
4
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
5
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
6
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
7
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
8
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
10
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
11
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
13
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
14
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
15
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
16
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
17
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
18
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
19
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
20
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद

तीन धरणे १०० टक्के भरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 01:26 IST

नाशिक : गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. आळंदी, वालदेवी व भावली हे तीन मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत, तर गंगापूर, दारणा धरणांचा साठा नव्वदीकडे सरकत असल्याने पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्ग वाढविण्यात येणार आहे.

ठळक मुद्देपावसाचा जोर कायम : दहा प्रकल्पांतून पाण्याचा विसर्ग सुरू

नाशिक : गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. आळंदी, वालदेवी व भावली हे तीन मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत, तर गंगापूर, दारणा धरणांचा साठा नव्वदीकडे सरकत असल्याने पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्ग वाढविण्यात येणार आहे.अनेक लहान-मोठ्या प्रकल्पांमध्ये पाणीसाठा वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून अशा प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. गंगापूर धरणातील विसर्ग मात्र कमी करण्यात आला आहे.जिल्ह्यातील काही तालुक्यात जोरदार पाऊस सुरू असला तरी अन्य तालुक्यांमध्ये अद्यापही पुरेसा पाऊस झालेला नाही. गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सर्वदूर पावसाची नोंद झाली असली तरी कळवण, बागलाण, निफाड, देवळा येथे अपेक्षित पावसाची अजूनही प्रतीक्षा आहे. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात मात्र वाढ होताना दिसत आहे. गंगापूर धरणाची पाण्याची पातळी ८४ टक्क्यांवर पोहोचली असून, धरणातून ५३१० क्यूसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे. करंजवन ६८ टक्के भरले आहे.येथील पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. सध्या २२६३ क्यूसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. भावली धरण ८७ टक्के भरले आहे तर येथून १३,०५८ क्यूसेक, वालदेवी प्रकल्पातून ४०७, कडवा धरणातून ७०५६ तर नांदूरमधमेश्वरमधून ४६९८३ क्यूसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पावसाची टक्केवारीनाशिक : ३१.४, इगतपुरी : १३४.०,त्र्यंबकेश्वर : ७९.०, दिंडोरी : २९.०, पेठ : ५५.१, निफाड : ९.७, सिन्नर : २६.०, चांदवड : ११.०, देवळा : ३.४, येवला : ९.८, नांदगाव : ९.०, मालेगाव : १८.०, बागलाण : ६.०, कळवण : ७.०, सुरगाणा : ५२.३. जिल्ह्यात आता पर्यत झालेल्या पावसाने काही तालुक्यातील दुबार पेरणीचे संकट टळल्याने शेतकरी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे.जिल्ह्यातील एकूण २४ धरणांच्या पाण्याची टक्केवारी ४८ टक्के इतकी असून, मागीलवर्षी जुलैमध्ये ५६ टक्के इतका पाणीसाठा होता. काही भागात जोरदार पाऊस तर काही तालुक्यांमध्ये तुरळक पाऊस असल्यामुळे अजूनही धरणांच्या पाणीसाठ्यात पुरेशी वाढ होऊ शकलेली नाही. मात्र हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजामुळे पुढील चोवीस तासात जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पावसाची शक्यता असल्याने जिल्ह्यातील अनेक धरणांची पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे.