शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
5
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
6
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
7
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
8
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
9
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
10
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
11
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
12
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
13
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
14
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
15
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
16
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
17
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
18
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
19
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
20
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!

रेडिमेड झाडांसाठी तीन कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 00:58 IST

राज्य शासनाच्या वतीने राज्यात १३ कोटी वृक्षलागवडीच्या कार्यक्र मांतर्गत नाशिक महापालिकेला १२ हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले असून, दहा ते पंधरा फूट उंचीची ही रेडिमेड झाडे खरेदीसाठी तब्बल तीन कोटी रु पये महापालिका मोजणार आहे.

नाशिक : राज्य शासनाच्या वतीने राज्यात १३ कोटी वृक्षलागवडीच्या कार्यक्र मांतर्गत नाशिक महापालिकेला १२ हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले असून, दहा ते पंधरा फूट उंचीची ही रेडिमेड झाडे खरेदीसाठी तब्बल तीन कोटी रु पये महापालिका मोजणार आहे. सध्या विधान परिषदेच्या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता सुरू असल्याने महापालिकेने धावपळ करीत जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेकडून परवानगी घेण्यासाठी प्रस्ताव दाखल केला आहे.  राज्य शासनाच्या वतीने १ जुलै रोजी १३ कोटी वृक्षलागवडीचा उपक्रम हाती घेण्यात आला असून, या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी सर्व सरकारी यंत्रणा कामाला लावण्यात आल्या असून, त्यांनादेखील वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. महापालिकेला बारा हजार झाडांची लागवड करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. सदरच्या झाडे लावण्यासाठी तीन कोटी रु पयांची निविदा मनपा काढणार आहे. दहा फुटांपेक्षा अधिक उंचीची रोपे खरेदी केली जाणार असून, ती लावल्यानंतर वृक्षसंवर्धनाचा तीन वर्षे मुदतीचा ठेका दिला जाणार आहे. शहरातील मनपाच्या खुल्या जागा, शिक्षण संस्था तसेच, रु ग्णालयांच्या आवारात आणि रस्त्याच्या दुतर्फा, ही झाडे लावण्यात येणार आहे. त्यासाठी निवडलेल्या ५४ ठिकाणी १२ हजार ४३२ खड्डे खोदण्यात आले असून, त्यांना जिओ टॅगिंगदेखील करण्यात आले आहे.  हरितसेना संकेतस्थळावर नोंददेखील करण्यात आली आहे. खड्डे खोदले असले तरी वृक्षांचा पत्ता नसून आता वृक्षखरेदीसाठी निविदा काढण्यात येणार आहे. आचारसंहिते आता महापालिकेने सहा. निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्याकडे धाव घेतली आहे.८७ टक्के वृक्ष सुस्थितीतवृक्षलागवडीनंतर ते जतन करण्याचे आव्हान असले तरी गतवर्षी लावलेल्या झाडांपैकी ८७ टक्के झाडे सुस्थितीत असल्याचा प्रशासनाचा दावा आहे.४२०१६ मध्ये महापालिकेला तीन हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मनपाने ३०६८ वृक्षांची लागवड केली असून आजमितीस २२७० म्हणजे ७४ टक्के वृक्ष सुस्थितीत आहेत, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी मनपाला देण्यात आलेल्या पाच हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्टाच्या तुलनेत मनपाने ५,१६६ झाडांची लागवड केली. त्यापैकी ४,४९० (८७ टक्के) वृक्ष सुस्थितीत असल्याचा दावा मनपाने केला आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका