शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नर आगाराला तीन कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 00:44 IST

सिन्नर : कोरोना संसर्गामुळे गेल्या दीड महिन्यापासून प्रवासी वाहतूक ठप्प असल्याने एस.टी. महामंडळाच्या सिन्नर आगाराचे सुमारे तीन कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

सिन्नर : कोरोना संसर्गामुळे गेल्या दीड महिन्यापासून प्रवासी वाहतूक ठप्प असल्याने एस.टी. महामंडळाच्या सिन्नर आगाराचे सुमारे तीन कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.सिन्नर आगाराला विविध मार्गावर धावणाऱ्या फेऱ्यांतून दररोज अंदाजे तीन लाखांचे उत्पन्न मिळते. ग्रामीण व शहरी भागातदेखील नागरिकांना लालपरीचे दर्शन दुर्लभ झाले आहे. जिल्ह्यात ‘रेड झोन’ असल्याने सध्यातरी एसटी धावणार नाही. लॉकडाऊनमुळे शाळा, कॉलेजेस बंद आहेत. कारखाने मर्यादित कामगारांवर सुरू आहेत. मात्र, ग्रामीण भागातील शेतकºयांना बाजार समिती, बँक, दवाखाने, किरकोळ भाजीपाला, शेतीची उत्पादने विकण्यासाठी अथवा खरेदी करण्यासाठी शहरात येण्याचा एकमेव आधार लालपरीचाच आहे. लॉकडाऊनमुळे आगारातील ७३ बसेस जागेवरच थांबलेल्या आहेत. येथून रोज पुणे, नाशिक, मुंबईदरम्यान लांब पल्ल्याच्या अंतरावर प्रवाशांना घेऊन जाणाºया बसेस आजही आगारात उभ्या आहे.सिन्नर आगारामध्ये ५० तांत्रिक कर्मचाºयांची संख्या आहे. आगारातील वर्कशॉपमधील कर्मचारी रोज न चुकता वर्कशॉप मध्ये येऊन बंद स्थितीत असणाºया बसेसची तांत्रिक दुरुस्ती करून रोज बसेस चालू-बंद करत आहेत. बॅटºयांचे आयुष्य वाढवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. रोज सुमारे ६ लाखांचे उत्पन्न देणाºया या बसेस आगारामध्ये थांबून आहेत. आगारातील ३०० चालक-वाहक आज घरी बसून आहेत. बसेस बंद असल्याने पार्सल सुविधाही बंद झाली असून, त्या उत्पन्नावरही एस.टी.ला पाणी सोडावे लागले आहे.----------------------दररोज तीन लाखांच्या उत्पन्नावर पाणीसिन्नर आगारामध्ये १४५ वाहक व १५५ चालक आहेत. त्यात काही तालुक्यात जाणारे व इतर काही लांब पल्ल्याच्या मार्गावर बसची ने-आण करणारे वाहनचालक आहेत. शासनाच्या निर्णयाप्रमाणे मार्च महिन्याचे ७५ टक्के वेतन वाहक-चालक आणि कर्मचाºयांना देण्यात आले आहे. एप्रिल महिन्याचेही वेतन येत्या आठवड्यामध्ये मिळण्याची शक्यता असून, ते कर्मचाºयांना तातडीने देण्यात येईल. अनेक गावांमध्ये शालेय विद्यार्थी, नागरिक, कामगार अडकले असून, नागरिकांनी शासकीय नियमांची पूर्तता करून बसची मागणी नोंदवल्यास ग्रुपप्रमाणे ५० टक्के आसनक्षमतेनुसार बसची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. नागरिकांनी यासंदर्भात आगारात संपर्क साधावा, असे आवाहन आगार व्यवस्थापक भूषण सूर्यवंशी यांनी केले आहे.

 

टॅग्स :Nashikनाशिक