शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

कोंबड्यांची वाहतूक करणारा ट्रक उलटल्याने ४००कोंबड्या मृत्यूमुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 20:40 IST

नाशिक : नाशिक-पुणे महामार्गावर उपनगर नाका येथे मंगळवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास कोंबड्यांची वाहतूक करणारा टाटा कंपनीचा ट्रक उलटून ...

ठळक मुद्देट्रक दुभाजकावर जाऊन आदळला. ट्रकमधील जवळपास ४०० कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या

नाशिक : नाशिक-पुणे महामार्गावर उपनगर नाका येथे मंगळवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास कोंबड्यांची वाहतूक करणारा टाटा कंपनीचा ट्रक उलटून झालेल्या अपघातात ४००पेक्षा अधिक बॉयलर कोंबड्या मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली.सिन्नर तालुक्यातील वावी येथील पोल्ट्री फार्ममधून ८०० बॉयलर कोंबड्या घेऊन ट्रक (एमएच ०३ सीपी ९९५४) हा बुधवारी (दि.२०) रात्री मुंबईला जाण्यास निघाला. मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास उपनगरनाका दर्गा ओलांडून ट्रक काही अंतर पुढे गेला असता ट्रकला एका ट्रॅव्हलच्या लक्झरी बसने कट मारल्याने ट्रक दुभाजकावर जाऊन आदळला. यामुळे ट्रकमधील जवळपास ४०० कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या. यामुळे महामार्गावरील वाहतूक खोळंबली हाती. अपघातानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले. तत्काळ क्रेनच्या साह्याने उलटलेला ट्रक बाजूला करण्यात आला. मृत्यूमुखी पडलेल्या शेकडो कोंबड्या बुधवारी सकाळी मनपाच्या आरोग्य विभागाकडून उचलून भरून कचरा डेपोतील मृत जनावरांच्या विभागात पोहचविण्यात आल्या. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

 

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयAccidentअपघात