ठाणगाव विद्यालयातील तीन सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यांची चोरी
By Admin | Updated: August 26, 2016 22:00 IST2016-08-26T22:00:37+5:302016-08-26T22:00:51+5:30
ठाणगाव विद्यालयातील तीन सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यांची चोरी

ठाणगाव विद्यालयातील तीन सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यांची चोरी
ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील पुंजाजी रामजी भोर व डॉ. अण्णासाहेब शिंदे कनिष्ठ महाविद्यालयाच्या आवारात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्हीचे तीन कॅमेरे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले तर एका कॅमेऱ्याची तोडफोड केली. विद्यालयाचे सुमारे ७० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
सिन्नर रस्त्याने ठाणगाव गावात प्रवेश करतानाच रस्त्यावर पु. रा. भोर विद्यालयाची इमारत आहे. विद्यालयास माजी विद्यार्थी मंचच्या वतीने फेबु्रवारी २०१६ मध्ये सर्व वर्गखोल्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. त्यापैकी शाळेच्या मागील आवारातील तीन कॅमेरे चोरट्यांनी चोरून नेले तर एका कॅमेऱ्याची तोडतोड केल्याचे दिसून आले.
शुक्रवारी सकाळी विद्यार्थी शाळेत आल्यानंतर चोरीचा प्रकार उडकीस आला. विद्यार्थ्यांनी सदर बाब पर्यवेक्षक व्ही.सी. कवडे यांच्या निदर्शनास आणून दिली. सीसीटीव्हीचे यूपीएस जळालेले असल्याने फुटेज पाहता आले नाही. गुरुवारी रात्री चोरट्यांनी चोरी केल्याची शक्यता आहे. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. (वार्ताहर)