लोकअदालतीत ४५०० प्रकरणे निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 00:23 IST2020-02-08T23:56:58+5:302020-02-09T00:23:02+5:30
अपर जिल्हा सत्र न्यायालय व तालुका विधि सेवा समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या लोक अदालतीत ४ हजार ७०४ प्रकरणे निकाली निघाले आहेत. दाखल प्रकरणांमधून २५ लाख १९ हजार ३६ रुपयांची वसुली करण्यात आली.

मालेगावी लोकअदालतीत दाखल प्रकरणांचा निपटारा करताना अपर जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. एच. मोहंमद. समवेत वकील संघाचे अध्यक्ष आर. के. बच्छाव व न्यायाधीशांचे पॅनल.
मालेगाव : येथील अपर जिल्हा सत्र न्यायालय व तालुका विधि सेवा समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या लोक अदालतीत ४ हजार ७०४ प्रकरणे निकाली निघाले आहेत. दाखल प्रकरणांमधून २५ लाख १९ हजार ३६ रुपयांची वसुली करण्यात आली.
लोक न्यायालयात तालुक्यातील ३० हजार ४८८ प्रकरणे ठेवण्यात आली होती. जिल्हा सत्र न्यायालयात प्रलंबित असलेल्या १ हजार ५६९ प्रकरणांपैकी तडजोड होऊन ३१९ प्रकरणे निकाली निघाली आहेत. सदर प्रकरणांमधून ३१ लाख ८५ हजार ९४८ रुपयांची वसुली झाली आहे. दाखलपूर्व व प्रलंबित प्रकरणे मिळून ५ हजार २३ प्रकरणे निकाली निघाली आहेत. त्यातून ५७ लाख ४० हजार ९८४ रुपये वसुली झाली आहे. लोकअदालतीत १२ पॅनलची नियुक्ती करण्यात आली होती.
सदर लोकअदालतीचे कामकाज जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. एच. मोहंमद, न्यायाधीश ए.एस. गांधी, डी. डी. कुरुलकर, डी. वाय. गौड, एस. जी. लांडगे, ए. के. देशमुख, एम. डी. कांबळे, ए. एम. तामणे, वाय. पी. पुजारी, एन.एन. धेंड, श्रीमती जे. डी. हुशंगाबादे, जे. जे. इनामदार आदींनी पाहिले. लोकअदालतप्रसंगी वकील संघाचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.