शहरात सोनसाखळी चोरीच्या तीन घटना
By Admin | Updated: November 29, 2015 22:42 IST2015-11-29T22:41:53+5:302015-11-29T22:42:29+5:30
शहरात सोनसाखळी चोरीच्या तीन घटना

शहरात सोनसाखळी चोरीच्या तीन घटना
नाशिक : शहरात तीन ठिकाणी सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या आहेत. जयभवानीरोड परिसरातील लीलाबेन रंगरेज (५५) या शनिवारी दुपारी पायी जात असताना दुचाकीवर आलेल्या तरु णाने त्यांच्या गळ्यातील ४० हजार रुपयांची सोन्याची पोत खेचून नेली़ दुसऱ्या घटनेत हिरावाडीतील बाला सॅम (६५) या दुपारच्या सुमारास घराकडे पायी जात असताना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील ४९ हजार रु पये किमतीची सोन्याची पोत खेचून नेली़ तिसरी घटना भद्रकाली परिसरात घडली असून, शैलशकुमारी सेल्जनान (३५) या दुपारच्या सुमारास रस्त्याने पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील पोत खेचून पलायन केले़ या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये जबरी चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे़ (प्रतिनिधी)