सातपूरला पेटविल्या तीन दुचाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 00:53 IST2017-10-30T00:53:14+5:302017-10-30T00:53:20+5:30

प्रेमभंगाच्या रागावरून सातपूरच्या प्रबुद्धनगरात शनिवारी (दि.२९) मध्यरात्रीच्या सुमारास एका संशयित प्रेमवीराने तीन दुचाकी पेटविल्याची घटना उघडकीस आली आहे. घटनेची माहिती मिळताच सातपूर गस्त पथकाने घटनास्थळी दाखल होऊन दुचाकी अग्निशामक दलाच्या बंब बोलावून विझविल्या.

 Three bikes in Satpur | सातपूरला पेटविल्या तीन दुचाकी

सातपूरला पेटविल्या तीन दुचाकी

नाशिक : प्रेमभंगाच्या रागावरून सातपूरच्या प्रबुद्धनगरात शनिवारी (दि.२९) मध्यरात्रीच्या सुमारास एका संशयित प्रेमवीराने तीन दुचाकी पेटविल्याची घटना उघडकीस आली आहे. घटनेची माहिती मिळताच सातपूर गस्त पथकाने घटनास्थळी दाखल होऊन दुचाकी अग्निशामक दलाच्या बंब बोलावून विझविल्या. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रबुद्धनगर परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास एका माथेफिरू प्रेमवीराने प्रेमभंगाचा राग दुचाकींवर काढत पेट्रोल टाकून तीन दुचाकींना आग लावल्याची परिसरात चर्चा होती. मध्यरात्री घटनेची माहिती समजताच तत्काळ गस्त पथकावरील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत समोरील महिंद्र कंपनीतून अग्निशामक बंब बोलावला. पेटणाºया दुचाकींवर तत्काळ पाण्याचा मारा करून आग विझविली. दरम्यान, रविवारी (दि.२९) दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास याप्रकरणी गुन्हा सातपूर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला. यानंतर तपास पथकाने परिसरातील सीसीटीव्ही कॅमेºयांचे चित्रीकरण तपासले. चित्रीकरणामध्ये रात्रीचा प्रेमवीराचा प्रताप कैद झाला होता. या चित्रीकरणावरून संशयित प्रेमवीराचे धागेदोरे पोलिसांनी शोधत तपासाची चक्रे वेगाने फिरविली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश आखाडे, पोलीस उपनिरीक्षक शांतीलाल चव्हाण यांनी गुन्हे शोध पथकाच्या साहाय्याने चित्रीकरणात दिसणाºया संशयित अमित हिरामण जाधव (२१, रा.प्रबुद्धनगर) यास ताब्यात घेतले.
नैराश्यातून पेटविली वाहने
जाधव याने गुन्ह्याची कबुली देत प्रेमभंगाचा राग आल्यामुळे दुचाकी पेटविल्याचे पोलिसांना चौकशीत सांगितले. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरणावरून तत्काळ तपासचक्रे फिरवून संशयिताच्या मुसक्या आवळल्यामुळे दुचाकी जळीत कांडाचा उलगडा होऊन रहिवाशांना दिलासा मिळाला.

Web Title:  Three bikes in Satpur