सिन्नरफाटा खून प्रकरणी तिघांना अटक

By Admin | Updated: March 31, 2017 01:05 IST2017-03-31T01:04:47+5:302017-03-31T01:05:01+5:30

नाशिकरोड : सिन्नरफाटा येथील फरसाणच्या दुकानातील कामगार कृष्णा नागे यांच्या खून प्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी तिघा युवकांना अटक केली आहे.

Three arrested in Sinnarfta murder case | सिन्नरफाटा खून प्रकरणी तिघांना अटक

सिन्नरफाटा खून प्रकरणी तिघांना अटक

 नाशिकरोड : सिन्नरफाटा येथील फरसाणच्या दुकानातील कामगार कृष्णा नागे यांच्या खून प्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी तिघा युवकांना अटक केली आहे.
सिन्नरफाटा येथे बाजीराव भागवत याचे ओम बजरंग फरसाण मार्ट नावाच्या दुकानात कामाला असलेल्या कृष्णा उत्तम नागे (वय ४०, मूळ रा. टाकळी, जिल्हा अकोला) याचा मृतदेह चेहेडी दारणा नदी पुलाजवळील ज्ञानेश्वर गायधनी यांच्या शेताजवळ बुधवारी सकाळी मिळून आला होता. शवविच्छेदनाच्या अहवालामध्ये कृष्णा याचा मृत्यू गळा आवळून व डोक्यात कानामागे कुठल्यातरी टणक वस्तुने मारून झाल्याचे स्पष्ट करण्यात आल्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दारू पिण्याचे व्यसन असलेला कृष्णा हा मंगळवारी रात्री ८ वाजता दुकानातुन बाहेर पडल्यानंतर अमोल सूर्यभान सहाणे (३४ रा. भोरमळा सामनगावरोड), पप्पू ऊर्फ अंकुश शिवाजी नाठे (वय ३३, रा. एकलहरा रोड, स्वागत लॉन्सशेजारी), पवन त्र्यंबक बोरसे (वय ३४, रा. ओढारोड भोर मळा) यांच्यासोबत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तिघा संशयितांना त्यांच्या राहत्या घरून चौकशीसाठी ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असून, त्यांनी खुनाची कबुली दिली. मयत कृष्णा व संशयित तिघेजण हे मंगळवारी रात्री सिन्नरफाटा येथे दारू पिल्यानंतर शिवाजी पुतळ्यासमोर उड्डाण पुलाखाली स्वच्छतागृहाजवळ पुन्हा दारू पिण्यास बसले. यावेळी त्यांच्यात वादविवाद होऊन शिवीगाळ झाली. त्यानंतर संशयित रिक्षाचालक पवन बोरसे याच्या रिक्षातून अमोल सहाणे, पप्पू ऊर्फ अंकुश नाठे यांनी मयत कृष्णा याला सामनगावरोड भोर मळा येथील अमोल सहाणेच्या घराजवळील एका पडित बंगल्यात नेले. त्यानंतर त्याला मारहाण करून त्याचे डोके भिंतीवर आपटल्याने तो खाली पडला. त्यानंतर त्याचा गळा आवळून खून करण्यात आला. (प्रतिनिधी)

Web Title: Three arrested in Sinnarfta murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.