शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

तिघांना अटक : मालेगावच्या पवारवाडी पोलिसांची कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2016 22:52 IST

वेगवेगळ्या गुन्ह्यातील १६ लाखांचा माल हस्तगत

आझादनगर : मालेगाव येथील पवारवाडी पोलिसांनी केलेल्या कारवाईत गुरुवारी (दि.१८) रात्री चार वेगवेगळ्या गुन्ह्यात दोन पिकअप, दोन ट्रकसह एकूण १६ लाख ४६ हजार ८०० रुपयांचा माल हस्तगत केला. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.पवारवाडी पोलीस ठाणे हद्दीतील देवीचा मळा येथे ११ फेब्रुवारी रोजी रात्री सुताच्या गुदामाचे मागील दाराची कडी तोडून गुदामातील सुताचे ७४ थैल्या चोरीस गेल्या होत्या. याबाबत मोहंमद ताहीर जैनुलआबदीन यांनी फिर्याद दिली होती. याप्रकरणी अपर पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस पथकातील सहायक पोलीस निरीक्षक अरुण पगारे, हवालदार विनय देवरे, दीपक काकडे, प्रसाद राडे व पवारवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड, हवालदार बावीस्कर, पोलीस कर्मचारी बत्तीसे, दीपक गांगुर्डे, सचिन भामरे, सय्यद यांच्या संयुक्त पथकाने संशयितांचा कसोशीने शोध घेतला. यात गुरुवारी रात्री मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शेख मोहंमद शेख मेहबूब (२२) यास ताब्यात घेण्यात आले. शेख मेहमुद याने दिलेल्या माहितीनुसार शेख हारुण शेख निसार (२३), शेख आदिल शेख कलीम, रा. मालेगाव यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून पाच लाख रुपयांचा सुताचे थैल्या हस्तगत करण्यात आल्या. याप्रकरणी पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गढरी करीत आहेत, तर दुसऱ्या घटनेत शुक्रवारी सकाळी पावणेनऊच्या सुमारास नुरानीनगर येथे पोलीस गस्तीवर असताना भरधाव असणाऱ्या ट्रकचा (एमएच.१८- अ‍े. अ‍े. ८८८०) संशय आल्याने पोलिसांनी ट्रक थांबवून वाहनाची तपासणी केली असता ट्रकमध्ये आठ ब्रास वाळू असल्याचे आढळून आले. बेकायदेशीर वाळू चोरी प्रकरणी पवारवाडी पोलीस ठाणे गुरन २५/२६ भादवि ३७९, ३४ व गौण खनिज अधिनियम नुसार तलाठी प्रकाश सुधाकर पवार यांनी फिर्याद दिली. याप्रकरणी युनूस खान हनिफ खान पठाण, रा. धुळे व सचिन प्रल्हाद रायदे, रा. सोयगाव, मालेगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ट्रक व ४० हजार रुपये किमतीची वाळू असा ५ लाख ४० हजार रुपयांचा माल ताब्यात घेतला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक डी. आर. जारवाल करीत आहेत. (प्रतिनिधी)