संचालकासह तिघांना अटक

By Admin | Updated: July 15, 2014 00:48 IST2014-07-14T22:52:03+5:302014-07-15T00:48:05+5:30

संचालकासह तिघांना अटक

Three arrested with the director | संचालकासह तिघांना अटक

संचालकासह तिघांना अटक


नाशिक : जिह्यासह मराठवाड्यातील गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले केबीसी मल्टिट्रेड प्रा़ लिमिटेडमध्ये संचालक बापूसाहेब छबू चव्हाण (रा़ श्रीजी रो-हाऊस, जत्रा हॉटेलमागे, नाशिक) यांच्यासह कंपनीचे व्यवस्थापक पंकज शिंदे व वाहनचालक नितीन शिंदे यांना सोमवारी दुपारी आडगाव पोलिसांनी अटक केली़ पोलिसांकडे केलेल्या तक्रारीनुसार फ सवणुकीची रक्कम २५ कोटींवर गेली असून, प्रमुख संशयित भाऊसाहेब चव्हाण व आरती चव्हाण अद्यापही फ रार आहेत़
केबीसीचे मुख्य संचालक भाऊसाहेब व आरती चव्हाण हे सिंगापूरला पळून गेले असून, तिसरे संचालक बापूसाहेब बापू चव्हाण हे शहरातच असल्याची माहिती मोबाइल लोकेशनवरून पोलिसांना मिळाली़ सोमवारी दुपारी स्कॉर्पिओ (एमएच १५, डीएस ६८०४) वाहनातून बापू चव्हाण, कंपनीचे व्यवस्थापक पंकज राजाराम शिंदे (रा़ हिरावाडी) व वाहनचालक नितीन पोपटराव शिंदे हे नांदूर नाका परिसरातून जात असताना पोलिसांनी त्यांना अटक केली़
मुंबई-आग्रा महामार्गावरील केबीसी मल्टिट्रेड प्रा़ लिमिटेड या कंपनीचे संचालक भाऊसाहेब बापू चव्हाण, आरती भाऊसाहेब चव्हाण, बापूसाहेब छबू चव्हाण यांनी गुंतवणूकदारांना गुंतवणुकीवर जादा रकमेचे आमिष दाखविले़ सुरुवातीला गुंतवणूकदारांना पैसेही मिळाले; मात्र नंतर पैसे देण्याबाबत टाळाटाळ होऊ लागली़ याबाबत एकनाथ खैरनार यांनी आडगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्यानंतर दिवसागणिक तक्रारदारांची संख्या वाढू लागली आहे़ दरम्यान, फ सवणुकीची रक्कम २५ कोटींच्या घरात पोहोचल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे़(प्रतिनिधी)

Web Title: Three arrested with the director

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.