मालेगावी २० लाखांचे मांडूळ बाळगणाऱ्या तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:16 IST2021-01-03T04:16:13+5:302021-01-03T04:16:13+5:30

शहरातील कॅम्प भागात तिघे जण मांडूळ विक्रीसाठी येत असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांना मिळाली ...

Three arrested for carrying Rs 20 lakh in Malegaon | मालेगावी २० लाखांचे मांडूळ बाळगणाऱ्या तिघांना अटक

मालेगावी २० लाखांचे मांडूळ बाळगणाऱ्या तिघांना अटक

शहरातील कॅम्प भागात तिघे जण मांडूळ विक्रीसाठी येत असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांना मिळाली होती. त्यानुसार विशेष पोलीस पथकातील पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर घुगे, पोलीस हवालदार भूषण खैरनार, संदीप राठोड, पंकज भोये, प्रकाश बनकर आदींनी सापळा रचला. भोसले पेट्रोलपंपासमोर उभ्या असलेल्या वाहनाची (क्रमांक-जेजी ०६ बीएल २६७५) तपासणी केली असता वाहनात २० लाख रुपये किमतीचे जिवंत मांडूळ आढळून आले. पथकाने रंजेश गुलाबचंद चव्हाण (३०), सावन देवराज चव्‍हाण (३०), विनिताबाई गुलाबचंद चव्हाण रा. जामदे, तालुका साक्री, जि. धुळे या तिघांना ताब्यात घेतले आहे. तसेच मांडूळ व औषधी पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. पुढील तपास कॅम्प पोलीस करीत आहेत.

फोटो- ०२ मांडूळ

===Photopath===

020121\02nsk_28_02012021_13.jpg

===Caption===

फोटो- ०२ मांडूळ 

Web Title: Three arrested for carrying Rs 20 lakh in Malegaon