गांधी तलावातील बोटी जाळणाऱ्या तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:11 IST2021-07-04T04:11:40+5:302021-07-04T04:11:40+5:30

तीन महिन्यांपूर्वी ज्वलनशील पदार्थ टाकून गांधी तलावात ठेकेदाराने उभ्या केलेल्या बोटी पेटवून दिल्या होत्या. याबाबत गजानन चौकात राहणाऱ्या ठेकेदार ...

Three arrested for burning boats in Gandhi Lake | गांधी तलावातील बोटी जाळणाऱ्या तिघांना अटक

गांधी तलावातील बोटी जाळणाऱ्या तिघांना अटक

तीन महिन्यांपूर्वी ज्वलनशील पदार्थ टाकून गांधी तलावात ठेकेदाराने उभ्या केलेल्या बोटी पेटवून दिल्या होत्या. याबाबत गजानन चौकात राहणाऱ्या ठेकेदार काळू लक्ष्मण जाधव यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. रामकुंड धार्मिक स्थळ आहे दैनंदिन पर्यटक भाविक देवदर्शन करण्यासाठी गंगाघाटावर येतात. गांधी तलावात बोटीतून नौकाविहार पर्यटकांना घडविण्यासाठी पालिकेने ठेका दिला आहे मात्र स्मार्ट सिटीअंतर्गत काम सुरू असल्याने तलावात पाणी नाही म्हणून नौका विहार बंद होती. त्यामुळे ठेकेदाराने बोट तलावात कोपऱ्यात उभ्या केल्या होत्या. मार्चमध्ये अज्ञातांनी तलावातील उभ्या चार बोटींना आग लावून जाळल्या होत्या.

हा गुन्हा टोळी संघर्षातून घडल्याची शक्यता पोलिस सूत्रांनी वर्तविली होती. त्यानुसार अज्ञात आरोपीचा शोध घेण्याचे काम

तपास यंत्रणेमार्फत सुरू होते. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सत्यवान पवार, धनश्री पाटील, बाळ ठाकरे, शेखर फरताळे, राकेश शिंदे, विलास चारोस्कर, नितीन जगताप यांनी तंत्रज्ञान वापर करून गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार भांडी बाजारातील रहिवासी संशयित विकास ऊर्फ पिठल्या मंगेश व्यवहारे, दरी मातोरी येथील अजय ऊर्फ भैट्या बाळू जाधव व गंगा घाटावर राहणाऱ्या अक्षय ऊर्फ एजे हिरामण जाधव यांना सापळा रचून ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी आकाश प्रभाकर मोहिते यांच्या संगनमताने बोटींची जाळपोळ केल्याची कबुली दिली.

---इन्फो---

ठेकेदार लक्ष्मण उर्फ काळ्या पांडुरंग जाधव आणि संशयित विकास ऊर्फ पिठल्या व्यवहारे यांच्यात गंगा घाटावर हातगाडी उभी करण्यावरून वाद झाला होता. तर आकाश जाधव हा पोलिसांना बातम्या पुरवितो असा संशय निर्माण झाल्याने ठेकेदार लक्ष्मण जाधव याने धमकीदेखील दिली होती. त्याचा राग मनात धरून वचपा काढण्यासाठी चौघा संशयितांनी पेट्रोल टाकून बोटी जाळल्या होत्या.

Web Title: Three arrested for burning boats in Gandhi Lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.