शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

अंबड वसाहतीत चार गावठी कट्ट्यांसह तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 00:37 IST

अंबड औद्योगिक वसाहतीतील एक्स्लो पॉइंट येथे विनापरवाना गावठी कट्टा बाळगणाऱ्या तिघा संशयितांना अंबड पोलिसांनी सापळा रचून अटक केली. हे तिघेही चुंचाळे शिवारातील रहिवासी असून, त्यांच्याकडून चार गावठी कट्टे हस्तगत केल्याचे पोलिसांनी सांगितले.

ठळक मुद्देपोलिसांची कारवाई : एक्स्लो पॉइंट येथे यशस्वी साप‌‌ळा

सिडको : अंबड औद्योगिक वसाहतीतील एक्स्लो पॉइंट येथे विनापरवाना गावठी कट्टा बाळगणाऱ्या तिघा संशयितांना अंबड पोलिसांनी सापळा रचून अटक केली. हे तिघेही चुंचाळे शिवारातील रहिवासी असून, त्यांच्याकडून चार गावठी कट्टे हस्तगत केल्याचे पोलिसांनी सांगितले. एक्स्लो पॉइंट येथे शुक्रवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास संशयितांकडे गावठी कट्टे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे कारवाई करीत पोलिसांनी आकाश सिंग बिपिन सिंग याच्याकडून दोन, रोहित मस्के व एरिक कुतूर (तिघे रा,. चुंचाळे, अंबड ) यांच्याकडून दोन असे एकूण चार गावठी कट्टे हस्तगत केले.  अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी यांच्या सूचनेनुसार साहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे व त्यांच्या पथकाने  रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास अंबड येथील एक्स्लो पॉइंट येथे सापळा रचला. यावेळी तिघेही  संशयित संशयास्पदरीत्या वावरताना पोलिसांना दिसून आले. या तिघांना पोलिसांनी हटकले व त्यांची चौकशी करून झडती घेतली असता केली असता त्यांच्याकडे चार गावठी कट्टे आढळून आले. या कारवाईत  गणेश शिंदे यांच्यासह उत्तम सोनवणे, हेमंत आहेर, रफिक शेख ,राकेश राऊत मुरली जाधव आदी पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. दरम्यान, अटक केलेल्या तिघाही संशयितांविरोधात  अंबड पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारीArrestअटक