माळींसह तिघांचे अर्ज फेटाळले
By Admin | Updated: January 10, 2017 01:44 IST2017-01-10T01:44:43+5:302017-01-10T01:44:58+5:30
माळींसह तिघांचे अर्ज फेटाळले

माळींसह तिघांचे अर्ज फेटाळले
नाशिक : नांदगाव तालुक्यातील शर्तींच्या जमीन व्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या प्रांत वासंती माळी यांच्यासह तिघांचे अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळले आहेत. तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठ्यांसह जमिनींचे मालक अशा २३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. लाचलुपत प्रतिबंधक खात्याने नोटिसा बजावून कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. माळी, अॅड. शिवाजी सानप व मानजीभाई पटेल यांनी मालेगावच्या सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.