शटर तोडून दुकानातून साडेतीन लाखांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:17 IST2021-09-23T04:17:39+5:302021-09-23T04:17:39+5:30

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, द्वारका टाकळी रोड येथे राहणारे हुजेफा एकबाल हुसेन अत्तारी यांनी दिलेल्या फिर्याद दिली आहे. अत्तारी यांचे ...

Three and a half lakhs stolen from shop by breaking shutters | शटर तोडून दुकानातून साडेतीन लाखांची चोरी

शटर तोडून दुकानातून साडेतीन लाखांची चोरी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, द्वारका टाकळी रोड येथे राहणारे हुजेफा एकबाल हुसेन अत्तारी यांनी दिलेल्या फिर्याद दिली आहे. अत्तारी यांचे जुना सायखेडा रोड लोखंडे मळ्यात अलहुतेब ट्रेडर्स हार्डवेअर नावाचे दुकान आहे. त्यांनी मंगळवारी नेहमीप्रमाणे सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास दुकान बंद केले. अत्तारी हे बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे साडेआठ वाजता दुकान उघडण्यास आले असताना, त्यांना शटरच्या दोन्ही बाजूला लावलेले कुलूप दिसले नाही. त्यांनी शटर उघडून दुकानात प्रवेश करीत पैसे ठेवलेले काउंटर तपासले. मात्र, त्यांना ड्रॉवरमध्ये ठेवलेले साडेतीन लाखांची रोकड त्यांना मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी उपनगर पोलीस ठाण्यात धाव घेत, अज्ञात चोरट्याविरोधात दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून साडेतीन लाखांची रोकड चोरून नेत्याची फिर्याद दिली असून, या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Three and a half lakhs stolen from shop by breaking shutters