घरफोड्यांतील तीन फरार आरोपींना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2016 00:09 IST2016-08-08T00:09:25+5:302016-08-08T00:09:55+5:30
घरफोड्यांतील तीन फरार आरोपींना अटक

घरफोड्यांतील तीन फरार आरोपींना अटक
.मालेगाव : शहरातील विविध घरफोडीच्या गुन्ह्यात फरार असलेले तीन अट्टल गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिस पथकाने अटक केली. तिघांकडून पोलिसांनी दागिने, कॅमेरा, भ्रमणध्वनी संच, दुचाकी व रोकड आदि मुद्देमाल हस्तगत केला.
ताहीर जमाल शाहीद अहमद रा. गोल्डननगर, मुशीरअली नूरअली सय्यद (२०) रा. जाफरनगर, मोहंमद बिलाल मोहंमद अजमल अन्सारी (२४) रा. मालेगाव यांना अटक करण्यात आली. शहरातील विविध पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या अटकेने अनेक घरफोड्यांचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. जिल्हा पोलीस प्रमुख अंकुश शिंदे, अपर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा रचून तिघांना जेरबंद करून त्यांना रमजानपुरा पोलिसांच्या स्वाधीन केले.