शहरं
Join us  
Trending Stories
1
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
2
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
3
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
4
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
5
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
6
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
7
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
8
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
9
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
10
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
11
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
12
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
13
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
14
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
15
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
16
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
17
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
18
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
19
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
20
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात

गावठी कट्ट्याचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 00:50 IST

रविवार कारंजा परिसरातील हेमलता टॉकीजजवळ गप्पा मारत बसलेल्या दोघांना दुचाकीवर आलेल्या तिघा संशयितांनी गावठी कट्ट्याचा धाक दाखवून विकेट काढण्याची धमकी दिल्याची घटना शनिवारी (दि़२) रात्रीच्या सुमारास घडली़ विशेष म्हणजे या संशयितांनी या ठिकाणी बिअरच्या बाटल्या फोडून दहशत पसरविल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली होती़

नाशिक : रविवार कारंजा परिसरातील हेमलता टॉकीजजवळ गप्पा मारत बसलेल्या दोघांना दुचाकीवर आलेल्या तिघा संशयितांनी गावठी कट्ट्याचा धाक दाखवून विकेट काढण्याची धमकी दिल्याची घटना शनिवारी (दि़२) रात्रीच्या सुमारास घडली़ विशेष म्हणजे या संशयितांनी या ठिकाणी बिअरच्या बाटल्या फोडून दहशत पसरविल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली होती़  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गाडगीळ लेनमधील गणेश दिलीप कोठुळे हे रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास हेमलता टॉकीजजवळ भाऊ अभिजितसोबत गप्पा मारत होते़ यावेळी संशयित जितेंद्र शेटे, गणेश पेठकर व अवधूत (पूर्ण नाव माहीत नाही, तिघे रा. गंगावाडी, नाशिक) हे दुचाकीवरून तिथे आले व बिअरच्या बाटल्या फोडून परिसरात दहशत निर्माण केली़ यानंतर संशयित थेटे हा कोठुळे बंधूंजवळ गेला व आपल्याकडील गावठी कट्टा दाखवून एकेकाची विकेट काढतो, अशी धमकी दिली़  या प्रकरणी गणेश कोठुळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सरकारवाडा पोलिसांनी या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे़रिक्षा जाळणाऱ्या दोघांना अटकजुन्या वादातून रिक्षा जाळल्याची घटना रविवारी (दि़३) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास रामवाडी परिसरातील गोदापार्क च्या स्वच्छतागृहाजवळ घडली़ या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी संशयित प्रशांत बाळासाहेब फड व अतुल शशिकांत मुर्तडक (दोघेही रा. रामवाडी, पंचवटी, नाशिक) या दोघांना अटक केली आहे़ गोरख लहामगे (हनुमानवाडी, नागरे मळा, पंचवटी) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार रामवाडीतील गोदापार्कजवळ असलेल्या सुलभ शौचालयाच्या बाजूला आपली रिक्षा (एमएच १५, झेड ११३४) उभी केली होती़ रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास संशयित फड व मुर्तडक यांनी नातेवाइकांकडील जुन्या भांडणाच्या रागातून रिक्षाची काच फोडून आग लावली़ यामध्ये रिक्षाचे मोठे नुकसान झाले असून, या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़पळसेत जुगार अड्ड्यावर छापापळसेजवळील फिल्टर प्लँट परिसरात जुगार खेळणाºया सहा जुगाºयांवर नाशिकरोड पोलिसांनी रविवारी (दि़३) सायंकाळी छापा टाकून कारवाई केली़ या जुगाºयांकडून पोलिसांनी जुगाराचे साहित्य व रोकडही जप्त केली आहे़पळसेजवळील पुलाखाली जुगार सुरू असल्याची माहिती नाशिकरोड पोलिसांना मिळाली होती़ त्यानुसार सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास या ठिकाणी छापा टाकला असता संशयित शिवाजी रामू गायधनी, नवनाथ खंडू गायके, रमेश नामदेव शिंदे, महादू खंडू गायधनी, शिवराम रामनाथ ढेरिंगे व गणेश चोपडा (सर्व रा. पळसे, ता. जि. नाशिक) हे जुगार खेळताना आढळून आले़ पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेऊन जुगाराचे एक हजार २५० रुपये व साहित्य जप्त केले़ या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ओढा शिवारात महिलेचा मृत्यूनाशिक- औरंगाबाद महामार्गावरील ओढा शिवारात कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेचा तोल जाऊन पाण्यात पडल्याने मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि़३) दुपारी घडली़ अलका गजानन सोनवणे (४५, रा. ओढा शिवार, ता. जि. नाशिक) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोनवणे या दुपारी गोदावरी नदीपात्रात कपडे धुवत होत्या़ त्यांचा अचानक तोल गेल्याने त्या पाण्यात पडल्या. त्यांना पाण्याबाहेर काढून उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाºयांनी तपासून मयत घोषित केले़  या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.शहरातून तीन दुचाकींची चोरीशहरातील पंचवटी, गंगापूर व सातपूर या परिसरातून चोरट्यांनी बुलेटसह तीन दुचाकी चोरून नेल्याच्या घटना घडल्या आहेत़ इंदिरानगर येथील दिगंबर विश्वनाथ सोनवणे यांची २० हजार रुपये किमतीची डिस्कव्हर दुचाकी (एमएच १५, डीए ५१६३) चोरट्यांनी पंचवटीतील एका खासगी हॉस्पिटलच्या पार्किंगमधून चोरून नेली़ औरंगाबाद रोड परिसरातील रहिवासी प्रमोद राऊत यांची तीस हजार रुपये किमतीची पल्सर दुचाकी चोरट्यांनी सातपूर औद्योगिक वसाहतीतून चोरून नेली़ महात्मानगर येथील रहिवासी प्रथमेश गांगुर्डे यांची बुलेट दुचाकी (एमएच १५, ईयू ००८१) चोरट्यांनी घराजवळून चोरून नेली़ या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय