खंडणीसाठी जिवे मारण्याची धमकी
By Admin | Updated: March 18, 2015 23:23 IST2015-03-18T23:23:33+5:302015-03-18T23:23:45+5:30
खंडणीसाठी जिवे मारण्याची धमकी

खंडणीसाठी जिवे मारण्याची धमकी
नाशिक : खंडणीची रक्कम देत नसल्याच्या कारणावरून एकास जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ पंचवटीतील हनुमाननगरमध्ये राहणारे मोहित महेंद्र अग्रवाल यांच्याकडे एक युवक जानेवारीपासून खंडणीची मागणी करीत होता़ मात्र त्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने संबंधित युवकाने अग्रवाल यांना दूरध्वनीवरून जिवे ठार मारण्याची धमकी दिली़ या प्रकरणी भद्रकाली ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे़