शहरं
Join us  
Trending Stories
1
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
2
२० विमाने अन् ५० जहाजे गिळली...! बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य शास्त्रज्ञांनी उलगडले खरे, पण... नुकतेच एक विमान...
3
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
4
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
5
रशियन लोकांना तुर्की आवडत नाही? दोन वर्षांत तुर्कस्तानातील रशियन लोकसंख्या अर्ध्यावर!
6
हिमालयातलं पाणी बॉटलमधून विकतेय अभिनेत्री, एका बाटलीची किंमत वाचून झोप उडेल
7
नवऱ्याशी भांडल्यावर बायकोने दीड वर्षांच्या मुलाला दुसऱ्या मजल्यावरुन फेकलं, झाला मृत्यू
8
पाकिस्तानचा असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन; अमेरिकेतूनच टीका होऊ लागली
9
अनेक वर्षांनी कार्यकर्ता भेटला तरी नावाने हाक मारणारे शरद पवार ‘ती’ नावे कसे विसरले?
10
यासिन मलिकच्या घरासह श्रीनगरमध्ये ८ ठिकाणी छापे; ३५ वर्षे जुन्या सरला भट्ट हत्या प्रकरणात कारवाई
11
"मला दोन मिनिटांतच समजेल..., भारतावर लादलेल्या टॅरिफने..."; अलास्कातील बैठकीपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा! 
12
सोने खरेदीची सुवर्णसंधी! एकाच दिवसात सोने १४०० रुपयांनी स्वस्त, ट्रम्प यांच्या घोषणेचा परिणाम!
13
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
14
"लग्न करायचंय, धर्म बदल"; प्रियकरानं टाकला दबाव, कुटुंबानं दिला त्रास, वैतागलेल्या तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल!
15
Maratha Morcha: ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मराठा आंदोलकांच्या मोर्चामुळे ताण वाढणार!
16
Asia Cup 2025 : जसप्रीत बुमराह खेळणार का? गिलसंदर्भात काय शिजतोय प्लॅन? जाणून घ्या सविस्तर
17
क्रिकेटपटू आकाशदीपने नवी कोरी फॉर्च्युनर घेतली; महागात पडली, डीलरही गोत्यात
18
IPL सट्टेबाजी: धोनीच्या १०० कोटींच्या मानहानीच्या दाव्याबाबत उच्च न्यायालयाची मोठी कारवाई
19
"भारताविरोधात माझा मुलगा लढेल, तो शहीद झाला तर नातू लढेल"; आसिम मुनीर अमेरिकेत जाऊन काय बोलले?
20
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'

हजारो तरुणांना मिळणार रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2019 00:49 IST

विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी अवघा २८ दिवसांचा कालावधी उरला असल्याने सर्वपक्षीय नेत्यांकडून राज्यात प्रचारसभांचे नियोजन होत आहे. या कालावधीत वेगवेगळ्या मतदारासंघात राज्यस्तरीय व राष्ट्रीय नेत्यांच्या सभांचे व्यासपीठ, साउंड सिस्टीम, बॅरेकेटिंग अशा कामांच्या माध्यमातून जिल्हाभरासह शेजारी राज्यांमधील तरुणांना हंगामी रोजगार उपलब्ध होणार आहे.

नाशिक : विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी अवघा २८ दिवसांचा कालावधी उरला असल्याने सर्वपक्षीय नेत्यांकडून राज्यात प्रचारसभांचे नियोजन होत आहे. या कालावधीत वेगवेगळ्या मतदारासंघात राज्यस्तरीय व राष्ट्रीय नेत्यांच्या सभांचे व्यासपीठ, साउंड सिस्टीम, बॅरेकेटिंग अशा कामांच्या माध्यमातून जिल्हाभरासह शेजारी राज्यांमधील तरुणांना हंगामी रोजगार उपलब्ध होणार आहे.राजकीयप्रचार सभांमधूून निर्माण होणारी रोजगाराची संधी साधण्यासाठी गुजरातसह उत्तर प्रदेश, बिहारमधून हजारो तरुण नाशिकमध्ये दाखल होत आहेत. नाशिकमध्ये निवडणुकीच्या रणधुमाळीत आघाडीच्या उमेदवारांसाठी राष्ट्रवादी व काँग्रेससोबतच युती झाल्यास शिवसेना व भाजपच्या राज्यस्तरीय व राष्ट्रीय नेत्यांच्याही एकत्रित सभा होऊ शकतात. या सभांसाठी व्यासपीठ, साउंड सिस्टीम, प्रकाश योजना व विद्युत पुरवठा यासाठी ज्या इच्छुकांना उमेदवारी मिळण्याची खात्रीआहे, त्यांच्यासह पक्ष पदाधिकाऱ्यांकडून मंडप डेकोरेटर्सच्या तारखा बुक करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी कोटेशन मिळविण्यापासून त्यांना अ‍ॅडव्हान्स देण्याचे नियोजनही सुरू आहे. यात राज्यस्तरीयनेत्यांच्या सभेला पाच ते सहा लाख रुपयांचा खर्च होण्याचा अंदाजअसून, राष्ट्रीय नेत्यांच्या सभेला हाच खर्च दहा लाखांपर्यंत जाऊ शकण्याचा अंदाज मंडप व डेकोरेटर्स व्यावसायिकांकडून व्यक्त होत  आहे.राजकीय पक्ष व उमेदवारांना मोठ्या प्रमाणात निधीची जुळवाजुळव करावी लागत असून, मंडप डेकोरेटर्स समोर संपूर्ण व्यवस्था पाहण्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध करण्याचे आव्हान असते. त्यामुळे मोठ्या सभांचे नियोजन तीन ते चार व्यावसायिक एकत्र येऊन करीत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळते आहे.असे होते सभेचे नियोजनविविध पक्षांच्या राज्यस्तरीय नेत्यांच्या सभांना पाच ते सात फूट उंचीचा तसेच चाळीस ते ५० फूट लांब व ३० ते ४० फूट रुंदीचे व्यासपीठ तयार करावे लागते. त्यासाठी साधारण एक ते सव्वा लाख रुपये खर्च येतो. या सभांसाठी प्रति दहा रुपयांप्रमाणे तीन ते चार हजार खुर्च्याही उपलब्ध करू द्याव्या लागतात. त्याचप्रमाणे १० ते १२ हजार चौरसफुटांच्या चटयांचीही व्यवस्था करावी लागते. सोबतच लाइटसाठी चार ते पाच जनरेटरची व्यवस्था करावी लागते. साउंडसिस्टीमसाठी सुमारे ५० हजारांपासून ते दीड लाखांपर्यंतच्या खर्चासह राज्यस्तरीय नेत्यांच्या सभेसाठी सुमारे साडेचार ते पाच लाख रुपयांचा खर्च येतो, तर राष्ट्रीय नेत्यांच्या सभांसाठी या यंत्रणेत जवळपास दुपटीने वाढ होते.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Nashikनाशिक