थकबाकीदार इच्छुकांनी भरले हजारो रुपये

By Admin | Updated: February 8, 2017 00:51 IST2017-02-08T00:51:06+5:302017-02-08T00:51:31+5:30

माजी जिल्हा परिषद अध्यक्षांसह पाच जणांचा समावेश

Thousands of thousands of people filled with tiresome desires | थकबाकीदार इच्छुकांनी भरले हजारो रुपये

थकबाकीदार इच्छुकांनी भरले हजारो रुपये

नाशिक : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी उमेदवारी अर्जासोबत जोडणे आवश्यक असलेल्या ना हरकत दाखल्यासाठी इच्छुकांची धावपळ उडाली आहे. याउलट हे दाखले देताना नाशिक जिल्हा परिषदेचा मात्र वर्षानुवर्षे थकीत असलेली हजारो रुपयांची थकबाकी वसूल होण्याचा फायदा झाला आहे. जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत ना हरकत व थकबाकीदार नसल्याबाबत दाखले देण्यात येतात. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या शंभरहून अधिक इच्छुकांनी ना हरकत दाखले घेतले आहेत, तर पाच आजी-माजी सदस्य व पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे थकीत असलेली थकबाकी भरत थकबाकीदार नसल्याचा दाखला घेतला आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व विद्यमान सदस्य जयश्री पवार  यांनी त्यांच्याकडील असलेली ८  हजार ५१२ रुपयांची थकबाकी जिल्हा परिषदेच्या लेखा विभागात भरल्याची माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)
सर्वाधिक थकबाकी
पंचायत समितीत सदस्य असलेले जगन आगळे यांनी त्यांच्याकडील सुमारे दीड हजार रुपयांची थकबाकी भरली आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य नानासाहेब पाटील यांनी त्यांच्याकडील २५८ रुपयांची थकबाकी जिल्हा परिषदेकडे भरल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. अनिलकुमार गंगाधर अहेर यांच्याकडील असलेली सुमारे १४३५ रुपयांची, तर सर्वाधिक थकबाकी असलेल्या जिल्हा परिषद सदस्य कलावती हरिश्चंद्र चव्हाण यांच्याकडील २० हजार ३९८ रुपयांची थकबाकी त्यांनी भरली आहे. ना हरकत दाखल्यांच्या निमित्ताने जिल्हा परिषदेची थकलेली हजारो रुपयांची थकबाकी या निमित्ताने भरली गेल्याचे चित्र आहे. यातही अनिल अहेर १९९८ मध्ये अध्यक्ष होते, तर जगन आगळेही २००७ पूर्वी पंचायत समितीत सदस्य असल्याने दशकभरापासून असलेली थकबाकी वसूल करण्यात यश आल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात होती.

Web Title: Thousands of thousands of people filled with tiresome desires

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.