बंदोबस्तासाठी रेल्वेचेदीड हजार जवान
By Admin | Updated: July 28, 2015 01:53 IST2015-07-28T01:53:29+5:302015-07-28T01:53:44+5:30
बंदोबस्तासाठी रेल्वेचेदीड हजार जवान

बंदोबस्तासाठी रेल्वेचेदीड हजार जवान
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त आणि सुरक्षा ठेवण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असतानाच दीड हजार रेल्वे सुरक्षा बल जवानांची फौज या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहे.
नाशिक येथे पहिल्या शाही पर्वणीसाठी पुढील महिन्यात साधू-महंतांबरोबरच लाखो भाविकांचा जनसागर उसळणार आहे. यासाठी रेल्वे सुरक्षा जवान (आरपीएफ) नियुक्त करण्यात आले आहेत. आरपीएफचे आयुक्त चंद्रमोहन मिश्र यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत यासंबंधी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. त्यानुसार नाशिकरोड, मनमाड, नांदगाव, भुसावळ, इगतपुरी या जंक्शन स्टेशनबरोबरच ओढा, देवळाली, निफाड, लासलगाव आदि रेल्वे स्टेशनच्या प्रत्येक प्रवेशद्वारावर आणि फलाटांवर टेहळणी करण्यासाठी आवश्यक जवान आणि अधिकाऱ्यांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)