नाशिक : हर हर महादेव..., जय भोले...बम बम भोले...चा जयघोष करीत हजारो भाविक तीसऱ्या श्रावणी सोमवारच्या पुर्वसंध्येला शहरातून त्र्यंबकनगरीकडे रवाना झाले. तीस-या श्रावणी सोमवारनिमित्त दरवर्षी त्र्यंबकराजाचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या औचित्यावर मध्यरात्रीपासून ब्रम्हगिरी पर्वताभोवती प्रदक्षिणा घालण्यास भाविकांनी सुरूवात केली होती. ‘त्र्यंबक यात्रा’ कॅच करण्यासाठी महामंडळाच्या नाशिक विभागाने २७५ बसेस नाशिक-त्र्यंबकेश्वर-नाशिक मार्गावर सोडल्या होत्या.व्रतवैकल्य, उपासना, सण-उत्सवांचे पर्व म्हणून श्रावण महिना ओळखला जातो. श्रावण महिना उजाडताच भाविकांना वेध लागते ते ब्रम्हगिरी फेरीचे. श्रावणी सोमवारनिमित्त महादेव मंदिरांमध्ये भाविकांची लगबग पहावयास मिळाली. तीस-या श्रावणी सोमवारच्या औचित्यावर ब्रम्हगिरीला प्रदक्षिणा घालण्यासाठी आणि कुशावर्तामध्ये स्नान करण्याकरिता मोठ्या संख्येने भाविक त्र्यंबकनगरीत पुर्वसंध्येला पोहचले होते.
‘बम बम भोले’चा जयघोष करीत हजारो भाविक त्र्यंबकनगरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 21:14 IST
तीस-या श्रावणी सोमवारच्या औचित्यावर ब्रम्हगिरीला प्रदक्षिणा घालण्यासाठी आणि कुशावर्तामध्ये स्नान करण्याकरिता मोठ्या संख्येने भाविक त्र्यंबकनगरीत पुर्वसंध्येला पोहचले होते.
‘बम बम भोले’चा जयघोष करीत हजारो भाविक त्र्यंबकनगरीत
ठळक मुद्दे२७५ बसेस नाशिक-त्र्यंबकेश्वर-नाशिक मार्गावर आनंदाला उधाण; उत्साह शिगेलाहर हर महादेवचा चा जयघोष करत भाविक बसेसद्वारे त्र्यंबकेश्वरला