शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

विठ्ठलनामाच्या जयघोषाने दुमदुमली कुंभनगरी,टाळ-मृदंगाचा गजरात हजारो भाविक त्र्यंबकेश्वरकडे रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 16:17 IST

संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराजांची यात्रा शुक्रवारी (दि.12) होत असून, त्यासाठी नाशिक शहर मार्गे दिंडय़ा-पताकांसह हजारो वारकरी त्र्यंबकेश्वरच्या दिशेने रवाना होत असल्याने कुंभनगरी नाशिकच्या रस्त्यांवर टाळ-मृदंगाच्या गजरासह विठ्ठलनामाचा जयघोष होत आहे

ठळक मुद्देसंतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यात्रोत्सव हजारो वारकरी त्र्यंबकेश्वरकडे रवाना टाळ-मृदंगाच्या गजरासह विठ्ठलनामाचा जयघोष

नाशिक : त्र्यंबकेश्वर येथे भरणारी संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराजांची यात्रा शुक्रवारी (दि.12) होत असून, त्यासाठी नाशिक शहर मार्गे दिंडय़ा-पताकांसह हजारो वारकरी त्र्यंबकेश्वरच्या दिशेने रवाना होत असल्याने कुंभनगरी नाशिकच्या रस्त्यांवर टाळ-मृदंगाच्या गजरासह विठ्ठलनामाचा जयघोष होत आहे. या दिंडय़ा बुधवारी त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होणार असून, पौष वद्य एकादशीच्या दिवशी म्हणजे 12 जानेवारी रोजी त्र्यंबकनगरीत संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथांची यात्रा भरणार आहे.महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या दिंडय़ांचे नाशिक शहरात स्वागत करण्यात येत आहे. सिन्नर, श्रीरामपूर, अहमदनगर या भागातून आलेल्या दिंडय़ांनी शिंदे, पळसे, नाशिकरोड, सिडको, सातपूर येथे तर कळवण, सटाणा, देवळा या भागातून येणाऱ्या दिंडय़ा शहरातील वेगवेगळ्या मंदिरांमध्ये विसावल्या आहेत. तर काही दिंडय़ा मंगळवारी पहाटेच त्र्यंबकेश्वरकडे रवाना झाल्या असून, या दिंडय़ा बुधवारी यात्रास्थळी पोहचतील. तर काही दिंडय़ा गुरुवारर्पयत त्र्यंबकेश्वरमध्ये पोहचणार असल्याने शुक्रवारी त्र्यंबकेश्वरमध्ये वैष्णवांचा मेळा अनुभवायला मिळणार आहे. दरम्यान, नाशिकमध्ये मुक्कामी राहिलेल्या दिंडय़ांचे स्थानिक नागरिकांनी वारकऱ्यांच्या फराळाची व निवासाची व्यवस्था केली आहे. यात्रेसाठी संत निवृत्तिनाथ महाराज मंदिर ट्रस्टतर्फे व त्र्यंबकेश्वर नगरपालिकेतर्फे यात्रेची विशेष व्यवस्था करण्यात आली असून, यावेळी निर्मळवारीची संकल्पना घेऊन यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे. यात्रेच्या निमित्ताने आठवडाभर नामवंत प्रवचनकार त्र्यंबकेश्वरमध्ये अखंड हरिनाम सोहळ्यासाठी हजेरी लावत असतात. संत निवृत्तिनाथ यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रासोबतच कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात येथील मराठी भाविकही त्र्यंबकनगरीत दाखल होत असतात.

13 जानेवारीपर्यत यात्रोत्सवत्र्यंबकेश्वरमध्ये 11 ते 13 जानेवारी या कालावधीत यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, 12 जानेवारी हा यात्रेचा मुख्य दिवस आहे. यात्रोत्सवासाठी राज्यातील विविध ठिकाणांहून वारकरी संप्रदाय, तसेच भाविक मोठय़ा संख्येने येतात. या यात्रेला पायी दिंडीने जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी त्र्यंबकेश्वर रस्त्यावर ठिकठिकाणी सेवाभावी संस्थांकडून चहा व नाष्टाची सोय करण्यात येते. विशेष म्हणजे काहीजण संपूर्ण कुटुंबासह वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी उपस्थित राहतात.

टॅग्स :NashikनाशिकTempleमंदिर