सिडकोत उघड्या घराच्या दरवाजातून हजारोंचा ऐवज लंपास
By Admin | Updated: May 20, 2017 17:10 IST2017-05-20T17:10:37+5:302017-05-20T17:10:37+5:30
उघड्या घराच्या दरवाजातून चोरट्यांनी मोबाइल फोनसह लॅपटॉप व रोख रक्कम असा ऐवज चोरून नेल्याची घटना

सिडकोत उघड्या घराच्या दरवाजातून हजारोंचा ऐवज लंपास
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : उघड्या घराच्या दरवाजातून चोरट्यांनी मोबाइल फोनसह लॅपटॉप व रोख रक्कम असा ऐवज चोरून नेल्याची घटना सिडकोतील महालक्ष्मी चौकात शुक्रवारी (दि़१९) मध्यरात्रीच्या सुमारास घडली ़
रईस सुफा शेख यांच्या फिर्यादीनुसार रात्री बारा ते साडेबारा वाजेच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या घराच्या उघड्या दरवाजातून प्रवेश करून दोन मोबाइल, एक लॅपटॉप तर विनोद केसरे यांच्या घरातून १२ हजार रुपयांची रोकड व मोबाइल फोन, असा ३० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला़
या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे़