शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

सातपूर येथील जलकुंभातून हजारो लिटर पाणी वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 00:54 IST

सातपूर कॉलनीतील जलकुंभाला तडे गेल्याने त्यातून मोठ्या प्रमाणावर पाणीगळती होत आहे. अनुचित घटना घडण्यापूर्वी महानगरपालिकेने वेळीच दखल घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

सातपूर : सातपूर कॉलनीतील जलकुंभाला तडे गेल्याने त्यातून मोठ्या प्रमाणावर पाणीगळती होत आहे. अनुचित घटना घडण्यापूर्वी महानगरपालिकेने वेळीच दखल घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. प्रभाग क्रमांक ११, सातपूर कॉलनी, जिजामाता शाळेजवळ असलेल्या जलकुंभातून हजारो लिटर पाण्याची गळती होत आहे. तसेच संरक्षक कम्पाउंडचीही दुरवस्था झालेली आहे. त्याचप्रमाणे जलकुंभाच्या पायऱ्यादेखील मोडकळीस आलेल्या आहेत. जवळच शाळेची मुले खेळत असल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष जीवन रायते यांच्यासह समाधान तिवडे, विकास सोनवणे, अरु ण भोसले, नीलेश भंदुरे, दत्तात्रय वामन, नवराज रामराजे, शरद सांगळे, नरेंद्र पुणतांबेकर, श्याम कुमावत, प्रदीप मुंढे, निखिल पाटील आदींनी मनपा पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता रवींद्र पाटील यांना घटनास्थळी बोलावून जलकुंभाची माहिती दिली व दुरु स्तीचे निवेदन देण्यात आले. तसेच जवळच नवीन उभारण्यात येणाºया जलकुंभाचे काम काही दिवसांपासून बंद असल्याचे निदर्शनास आणून दिले. गेल्या काही दिवसांपासून सिडको, सातपूर, कामटवाडे, अंबड गाव या भागात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय होत असून, याकडे महापालिका अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.सातपूर कॉलनीतील जलकुंभाजवळील तुटलेले चेंबर, मोडकळीस आलेल्या पायºया यांची दुरु स्ती लवकरच करण्यात येईल. तसेच पाणीगळती थांबविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. नवीन जलकुंभाचे थांबलेले काम लवकरच सुरू व्हावे यासाठी संबंधित ठेकेदाराला निर्देश देण्यात येतील.- रवींद्र पाटील, उपअभियंता, पाणीपुरवठा मनपा

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाWaterपाणी