दीडशे रुपयांसाठी काढावे लागणार हजाराचे बॅँक खाते !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:17 IST2021-07-07T04:17:18+5:302021-07-07T04:17:18+5:30

गेल्या वर्षापासून शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनाचा घरपोच कोरडा शिधा पुरविण्यात आला. मात्र, मार्च महिन्यानंतर ठेकेदाराची मुदत संपल्यामुळे ...

Thousands of bank accounts will have to be taken out for Rs. | दीडशे रुपयांसाठी काढावे लागणार हजाराचे बॅँक खाते !

दीडशे रुपयांसाठी काढावे लागणार हजाराचे बॅँक खाते !

गेल्या वर्षापासून शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनाचा घरपोच कोरडा शिधा पुरविण्यात आला. मात्र, मार्च महिन्यानंतर ठेकेदाराची मुदत संपल्यामुळे शासनाने नव्याने निविदा काढली नाही, परिणामी एप्रिल व मे महिन्यात विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनाचा कोरडा शिधा वाटप होऊ शकला नाही. त्यामुळे शासनाने आता विद्यार्थ्यांना रोख स्वरूपात पैसे देण्याचा व ती रक्कम थेट बॅँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. त्यासाठी जुलैअखेर बॅँक खाते काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

---------

शासनाच्या शाळांमधील जवळपास सर्वच विद्यार्थ्यांचे बॅँक खाते आहेत, त्यातही ज्या विद्यार्थ्यांचे काही कारणास्तव राहून गेले असतील ते त्यांना काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांचे यापूर्वी खाते असेल त्यांनी परत काढण्याची गरज नाही.

- सुभाष घुगे, पोषण आहार अधीक्षक

------

माझ्या पाल्याचे कोणत्याही बॅँकेत खाते नाही, बॅँक खाते काढण्यासाठी अनेक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते व योग्य डिपॉझिट भरल्याशिवाय बॅँक खाते काढण्यास नकार देते. अशावेळी पालकांनी काय करावे

- निर्मला कदम

---------

मध्यान्ह भोजनाचे पैसे किती मिळतील याची कोणतीही माहिती नाही, मात्र शंभर ते दीडशे रुपये मिळणार असतील तर त्यासाठी बॅँकेत हजार रुपये अनामत भरण्यासाठी पैसे कुठून आणावेत. त्यापेक्षा शासनाने रोख पैसे द्यावेत

- सुभाष देवरे

------

बॅँकेत खाते उघडण्यासाठी लागणार हजार रुपये

* शालेय विद्यार्थ्यांचे बॅँक खाते उघडण्यासाठी पालकांना मोठा भुर्दंड बसणार आहे. चालू बचत खात्यात किमान एक हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत अनामत रक्कम असावी असा बॅँकांचा वेगवेगळा नियम आहे.

* चालू बचत खाते उघडण्यासाठी बॅँकेला विविध कागदपत्रांची गरज भासते. मात्र, अनेक कुटुंबाकडे ही कागदपत्रे नसल्याने त्यांनी बॅँक खाते कसे काढावे हा प्रश्न आहे.

* मुलांना बॅँकेचे व्यवहार कसे हाताळावे याचे ज्ञान देणेदेखील आवश्यक आहे.

---------

२,९४,२९३

पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मिळणार

१,९१,५०८

सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मिळणार

----

कोणत्या वर्गात किती विद्यार्थी?

पहिली- ५४७७४

दुसरी- ५७४४९

तिसरी- ५७६३६

चौथी- ६२,६४६

पाचवी- ६१७८८

सहावी- ६४३३२

सातवी- ६६७७१

आठवी- ६०४०५

Web Title: Thousands of bank accounts will have to be taken out for Rs.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.