हजार शिक्षकांचा पुनर्रचित अभ्यासक्रम प्रशिक्षणात सहभाग

By Admin | Updated: June 9, 2014 01:04 IST2014-06-09T01:04:11+5:302014-06-09T01:04:30+5:30

टाकळी : इयत्ता तिसरी आणि चौथीच्या पुनर्रचित अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देण्यासाठी महापालिकेच्या वतीने आयोजित प्रशिक्षण शिबिरात सुमारे ९२२ शिक्षकांनी सहभाग घेतला

Thousand teachers participate in reconsideration course training | हजार शिक्षकांचा पुनर्रचित अभ्यासक्रम प्रशिक्षणात सहभाग

हजार शिक्षकांचा पुनर्रचित अभ्यासक्रम प्रशिक्षणात सहभाग

 

टाकळी : इयत्ता तिसरी आणि चौथीच्या पुनर्रचित अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देण्यासाठी महापालिकेच्या वतीने आयोजित प्रशिक्षण शिबिरात सुमारे ९२२ शिक्षकांनी सहभाग घेतला असून, या प्रशिक्षणात अभ्यासाबरोबरच खेळातून शिक्षण असे प्रशिक्षण दिले जात आहे. तपोवन रोडवरील पोद्दार इंटरनॅशनल शाळेत या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
महापालिका क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या शाळांमधील इयत्ता तिसरी व चौथीच्या वर्गशिक्षकांचे हे पाचदिवसीय प्रशिक्षण सुरू झाले आहे. या वर्गाच्या पुनर्रचित अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण महापालिकेच्या वतीने दिले जात आहे. यामध्ये एकूण ९२२ प्रशिक्षणार्थी शिक्षक सहभागी झाले आहेत. प्रशिक्षण देण्यासाठी जिल्हास्तरीय प्रशिक्षण घेतलेले ६० तज्ज्ञ मार्गदर्शक व राज्यस्तरीय प्रशिक्षण घेतलेले आठ तज्ज्ञ मार्गदर्शक शिक्षकांना मार्गदर्शन करीत असल्याचे मनपा शिक्षण मंडळ प्रशासन अधिकारी किरण कुंवर यांनी सांगितले.
इयत्ता तिसरीकरिता मराठी माध्यमाचे ३०४, इंग्रजी माध्यमाचे १७६ शिक्षक सहभागी झाले आहेत. चौथीसाठी मराठी माध्यमाचे ३०५, इंग्रजी माध्यमाचे १६७ शिक्षक सहभागी झाले आहेत. उर्दू माध्यमाच्या ५० शिक्षकांना मालेगाव येथील एटीटी हायस्कूल येथे प्रशिक्षण दिले जाणार असून, येत्या सोमवारपासून प्रशिक्षणास प्रारंभ होणार आहे. सर्व शिक्षकांना राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५ अंतर्गत प्राथमिक शिक्षक अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. ज्ञानरचनावाद, माहिती तंत्रज्ञान, गटकार्य, वर्ग अध्ययन, अध्यापनाचे दिग्दर्शन, स्वाध्याय व स्वअभ्यास अशी या प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये आहेत.
राजश्री गांगुर्डे, पुष्पा नवले, विजय निपाणीकर, विजया पणूवाले, मंगला एखंडे, भारती पाटील, अश्विनी देशमुख, संगीता बाविस्कर हे मार्गदर्शन करीत आहेत. दरम्यान, शिक्षण उपसंचालक भगवान सूर्यवंशी यांनी या प्रशिक्षण वर्गाला भेट देऊन उपक्रमाची पाहणी केली. (वार्ताहर)

Web Title: Thousand teachers participate in reconsideration course training

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.