रेंडाळे येथील चंदनाचे झाड चोरीला
By Admin | Updated: September 14, 2016 22:20 IST2016-09-14T22:00:55+5:302016-09-14T22:20:59+5:30
रेंडाळे येथील चंदनाचे झाड चोरीला

रेंडाळे येथील चंदनाचे झाड चोरीला
येवला : रेंडाळे येथील नवनाथ भगवंता आहेर व नथू काशी
आहेर यांच्या सामाईक बांधावरील १० ते १२ वर्षे वयाचे चंदनाचे झाड चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली.
वृक्ष चोरण्याआधी त्या वृक्षाच्या सुगंधाची चाचपणी केली असल्याच्या खुणा या वृक्षावर आहे. हे वृक्ष अतिशय अडचणीच्या ठिकाणी असल्याने वृक्ष चोरण्यासाठी गावातील व्यक्तीची मदत घेतली असल्याचे बोलले जात आहे.
नवनाथ आहेर यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून वनविभागाचे वनरक्षक दौड, वाघ, बागुल, वन्यजीव संरक्षक समिती अध्यक्ष प्रवीण
आहेर यांच्या उपस्थितीत पंचनामा केला. (वार्ताहर)