मृतदेह वाहून नेताना आमच्या अंगावर उभा राहिला काटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:16 IST2021-04-23T04:16:37+5:302021-04-23T04:16:37+5:30

ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या टाकीचा पाईप फुटतो अन‌् गळती सुरु होते. यामुळे रुग्णालयाच्या कोविड कक्षात ऑक्सिजन, व्हेंटिलेटरच्याआधारे श्वास घेणाऱ्यांचा श्वास ...

The thorn stood on our body while carrying the corpse | मृतदेह वाहून नेताना आमच्या अंगावर उभा राहिला काटा

मृतदेह वाहून नेताना आमच्या अंगावर उभा राहिला काटा

ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या टाकीचा पाईप फुटतो अन‌् गळती सुरु होते. यामुळे रुग्णालयाच्या कोविड कक्षात ऑक्सिजन, व्हेंटिलेटरच्याआधारे श्वास घेणाऱ्यांचा श्वास गुदमरायला लागला आणि एकापाठोपाठ तब्बल २२ रुग्ण अवघ्या तासाभरात दगावले. या भीषण दुर्घटनेने अवघा देश हळहळला. या रुग्णांचे मृतदेह जेव्हा अंतिम प्रवासाला निघाले तेव्हा त्यांना वाहून नेणाऱ्या शववाहिकाचालकांचेही हात वाहनाच्या स्टेअरिंगवर थरथरायला लागले होते. दुपारी तीन वाजल्यापासून तीन ते चार शववाहिकांमधून मृतदेह वाहून नेण्यास सुरुवात करण्यात आली. खैरनार, ठाकरे, सचिन काळे या चालकांनी रुग्णालय ते अमरधाम अशा फेऱ्या करीत एका फेरीत प्रत्येकी एका शववाहिकेतून तीन मृतदेह आम्ही वाहून नेले, असे या चालकांनी सांगितले. मृतदेह वाहून नेताना नातेवाईकांचे हुंदके अन‌् आक्रोशामुळे आमच्याही अंगाला शहारे आले होते. तो सगळा प्रसंग बघवत नव्हता.

--इन्फो--

शववाहिकाचालकांचा चमू धावला

शववाहिकाचालकांच्या दोन्ही शिफ्टमधील चमूला या दुर्घटनेमुळे पाचारण करण्यात आले होते. यावेळी रुग्णालयातील अन्य कर्मचाऱ्यांच्या मदतीला हा चमू धावून आला. वाहनचालक अंकुश किर्तीकर, राहुल वरखेडे, सागर चव्हाण, जाफर शेख, सचिन कदम, सागर देशमुख, कामील काजी, महेंद्र सोनवणे, आशिष पवार, इमरान पठाण आणि दशरथ व्यवहारे या सर्वांनी कोविड कक्षात धाव घेत नातेवाईकांकडून ओळख पटविलेले मृतदेह प्लास्टिक बॅगमध्ये बांधणी करण्यास प्राधान्य दिले. सर्व मृतदेह अवघ्या काही वेळेत बांधणी करून तळमजल्यावरील शवागृहात स्ट्रेचरवरून वाहून आणले. तेथून ज्या मृतदेहांचे नातेवाईक आले, त्यांनुसार मृतदेहांची नोंद करून मृतदेह शववाहिकेत ठेवत सोबत नातेवाईकांना घेऊन शववाहिकाचालकांनी अमरधाम गाठले.

----इन्फो--

अशी दुर्घटना कधीही घडू नये

एका दिवसांत अवघ्या दोन तासांत २२ रुग्णांचा जीव जातो आणि त्यांचे मृतदेह वाहून नेण्याची दुर्दैवी वेळ ओढवते, अशी दुर्घटना कधीही कोठेही घडू नये, अशीच आम्ही ईश्वराकडे प्रार्थना करतो या शब्दांत शववाहिकाचालकांनी आपल्या भावना बोलून दाखविल्या. रुग्णालयाच्या आवारात झालेली गर्दी, सुरू असलेला कल्लोळ आणि मृतदेह बघून मन सुन्न झाले होते, काय करावे, हेच काहीवेळ सुचेनासे झाले होते, असे धीरज व अनिल यांनी सांगितले.

---

फोटो क्र : २२पीएचएपी७०

===Photopath===

220421\22nsk_35_22042021_13.jpg

===Caption===

शववाहिकाचालक धीरज खैरनार व अनिल ठाकरे

Web Title: The thorn stood on our body while carrying the corpse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.