शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या उपन्नात तीस टक्के घट शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 01:23 IST

नाशिक- कोरोनामुळे महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नावर सुमारे तीस टक्के परिणाम होणार आहे. त्यामुळे तीस टक्के अनावश्यक कामांना कात्री लावण्याबरोबरच शासनाच्या मुद्रांक सलवत योजनांच्या धर्तीवर महापलिका देखील विविध योजना राबवून उत्पन्न वाढविणार असल्याची माहिती आयुक्त कैलास जाधव यांनी दिली. जुने बिटको रूग्णालय हे केवळ संसर्गजन्य रोगांसाठीच आरक्षीत करण्यात येणार आहे. त्याच बरोबर याठिकाणी पीजी कोर्स सुरू करण्यवर भर असल्याचेही आयुक्तांनी सांगितले.

ठळक मुद्देअनावश्यक कामांना कात्री: सवलत योजनांच्या माध्यमातून महसूल वाढविणार

नाशिक- कोरोनामुळे महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नावर सुमारे तीस टक्के परिणाम होणार आहे. त्यामुळे तीस टक्के अनावश्यक कामांना कात्री लावण्याबरोबरच शासनाच्या मुद्रांक सलवत योजनांच्या धर्तीवर महापलिका देखील विविध योजना राबवून उत्पन्न वाढविणार असल्याची माहिती आयुक्त कैलास जाधव यांनी दिली. जुने बिटको रूग्णालय हे केवळ संसर्गजन्य रोगांसाठीच आरक्षीत करण्यात येणार आहे. त्याच बरोबर याठिकाणी पीजी कोर्स सुरू करण्यवर भर असल्याचेही आयुक्तांनी सांगितले.कोरोनामुळे कर वसुलीवर मोठा परीणाम होत आहे. घरपट्टी आणि पाणी पट्टी वसुल करताना एकंदरच नागरीकांची आर्थिक स्थिती बघता फार सक्ती करता येत नाही. त्यातच मनुष्यबळ हे कोरोना संदर्भातील कामांकडे वळविण्यात आले आहे.या सर्वांचाच परीणाम महापालिकेच्या नियोजनावर होत आहे. त्या पार्श्वभूमीवर नियोजन करताना तीस टक्के आता अत्यंत आवश्यक नसलेल्या कामांना कात्री लावण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे सवलती जाहिर करून प्रलंबीत उत्पन्न वाढीवर भर देण्यात येणार आहे. राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात सवलत दिल्याने आता बांधकाम क्षेत्राला चालना मिळाली आहे. अनेक बांधकाम व्यवसायिक डिसेंबर पर्यंत असलेल्या मुद्रांक शुल्कातील चार टक्के सवलतीचा लाभ घेण्यास उत्सूक आहेत. अशाच पध्दतीने काही सवलत योजनांचेनियोजन करण्यावर भर असणार आहे, असेही आयुक्त म्हणाले. नवीन भांडवली कामांपेक्षा काही सध्याची कामे योग्य पध्दतीने करण्यावर भर आहे. विशेषत: रस्त्यांची सध्या डागडूजी करण्यात येणार असून नवीन कामांबाबत टिकावू कामे करण्यावर भर असेल असेही ते म्हणाले.दरम्यान, महापालिकेच्या वतीने वैद्यकिय क्षेत्रातील मनुष्यबळाची उणिव भरून काढण्यासाठी बिटको रूग्णालयात पीजी शिक्षणक्रम सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे ज्यादा डॉक्टर्स उपलब्ध होतील.त्याच प्रमाणे जुने बिटको रूग्णालय हे केवळ संसर्ग जन्य आजारांसाठीच राखीव ठेवण्यात येणार असल्याचेही आयुक्त म्हणाले.गोदाकाठ सुशोभिकरणाचा आयुक्तांचा संकल्पनाशिकमध्ये सूत्र स्विकारल्यानंतर आता कारकिर्दीच्या दोन ते तीन वर्षातील संकल्प आयुक्त कैलास जाधव यांनी स्पष्ट केले. नाशिकला नैसर्गिक देणगी लाभलेल्या गोदावरी नदीच्या शुध्दीकरण व सुशोभिकरणावर भर देण्यात येणार आहेत. नागरीकांच्या यासंदर्भातील काही सूचना असतील तर त्याचे स्वागत आहे. देशात गोदावरीचा लौकीक वाढावा यादृष्टीने नियोजन करण्यात येणार आहे. तर दुसरा संकल्प आरोग्य आणि वैद्यकिय व्यवस्था सक्षमीकरण करण्यावर आयुक्तांचा भर आहे. त्याअंतर्गत बिटको रूग्णालयात सुविधा देतानाच नवीन शिक्षणक्रम सुरू करण्यात येणार आहेत. तसेच टेलीमेडीसीन सुरू करण्यात येणार असल्याचेही आयुक्तांनी सांगितले.

 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक