१४ शाळांकडे ७ कोटी थकले

By Admin | Updated: April 30, 2016 23:16 IST2016-04-30T22:10:29+5:302016-04-30T23:16:25+5:30

१४ शाळांकडे ७ कोटी थकले

Thirty crores of tired of 14 schools | १४ शाळांकडे ७ कोटी थकले

१४ शाळांकडे ७ कोटी थकले

मालेगाव- येथील महापालिकेच्या मालकीच्या इमारती आणि मोकळ्या जागा सुमारे ४६ शाळा आणि संस्थांना अत्यल्प वार्षिक भाडे करारावर दिलेल्या असताना त्यातील सुमारे १४ शैक्षणिक संस्था, शाळाचालकांकडे इमारत भाड्यापोटी तब्बल सात कोटी ६९ लाख ८५ हजार ९०१ रुपये भाडे थकले असून, संकीर्ण करवसुली विभागास भाडे वसूल करण्यास नाकेनऊ आले आहे.
शहरातील विविध संस्था आणि शाळांना अत्यल्प दरात इमारती दिल्या असून, त्यातील विविध शाळांच्या संचालकांकडे १४ इमारतीच्या भाड्यापोटी सात कोटी ६९ लाख ८५ हजार ९०१ रुपयांची थकबाकी आहे. सदर शाळा थकबाकी भरत नसल्याने मनपाच्या संकीर्ण करवसुली विभागासमोर भाडे वसुलीचे संकट उभे ठाकले आहे. मनपाच्या मालकीच्या इमारती आणि जागा नाममात्र भाड्याने शाळा-संस्थांना उपलब्ध करून दिल्या गेल्या. त्यात काही संस्थांना केवळ एक रुपयापासून जास्तीत जास्त ८७ हजार रुपये इतके भाडे आकारले जात होते. नाममात्र भाडे असताना शाळा-संस्थाचालक काही प्रमाणात भाडे भरत असत; मात्र २४ डिसेंबर २००९ ला महापालिकेच्या स्थायी समितीने ठराव (क्रमांक ४९८) केला. मनपा हद्दीत खुल्या मोकळ्या जागा सामाजिक संस्था व इतर संस्था विनाशुल्क वापरत होत्या. त्यांचे सर्वेक्षण करून नवीन रेडी रेकनरप्रमाणे जागेचे भाडे निश्चित करण्यात आले. गाजी अमानुल्ला खान यांनी तशी सूचना मांडली होती. त्यास नीलेश काकडे यांनी अनुमोदन दिले होते.
नवीन रेडी रेकनरप्रमाणे जागेचे भाडे निश्चित करून वार्षिक भाड्यावर दरवर्षी ३ टक्के भाडेवाढ करून ११ वर्षांसाठी सदर जागा भाडेतत्त्वावर देण्याचा ठराव करण्यात आला होता. २०१० येथे उपसमितीचा अहवालही मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार महापालिकेच्या मालकीच्या मोकळ्या जागा, गावठाणपैकी जागा अशा एकूण ४६ जागा नाममात्र भाड्याने दिल्या होत्या.
महापालिकेच्या उत्पन्नात वाढ व्हावी, या उद्देशाने नगररचना विभागाने या जागांचे सर्वेक्षण करून भाड्याचे मूल्यांकन केले. त्यानुसार २०१० मध्ये मनपास नवीन मूल्यांकनानुसार ४६ लाख ६८ हजार ८०८ रुपये झाले येणे आहे.
मालेगाव शहरातील १४ शाळा- संस्थांकडून २०१५-१६ या वर्षात एक कोटी ४९ लाख १७ हजार ६१४ रुपये वार्षिक भाडे घेणे आहे. त्या संस्थांकडे एकूण सात कोटी ६९ लाख ८५ हजार ९०१ रुपये इतकी थकबाकी आहे. याबाबत काही संस्थांनी आपणास अवाजवी वा जादा भाडे आकारणी केल्याची तक्रार केल्याने वाद सुरू आहे. त्यावर सुनावणी होणार आहे.

Web Title: Thirty crores of tired of 14 schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.